जे AFCAT 2 परीक्षेच्या निकालनुसार पात्र ठरतील त्यांना हवाई दल निवड मंडळ (AFSB) सोबत मुलाखतीसाठी बोलावले जाईल. AFCAT 2 परीक्षेतील त्यांचे गुण आणि AFSB मुलाखतीतील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन पात्र उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाईल.
AFCAT 2 निकाल डाउनलोड करण्यासाठी :
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर AFCAT-2 निकाल लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– तुमचा निकाल तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.
– निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : Bharati Vidyapeeth Recruitment 2023: पुण्याच्या भारती विद्यापीठात होणार ‘या’ पदावर भरती; लगेच करा APPLY)
एएफसीएटी: २, २०२३ परीक्षेद्वारे फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटीसाठी गट-अ राजपत्रित अधिकार्यांची २७६ पदे भरली जातील. ज्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक शाखांचा समावेश आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल.
AFCAT ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना हवाई दल निवड मंडळ (AFSB) मुलाखतीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल. ज्यांनी NCC स्पेशल एंट्रीसाठी अर्ज केला आहे त्यांनी डेहराडून (1 AFSB), म्हैसूर (2 AFSB), गांधीनगर (3 AFSB), वाराणसी (4 AFSB), किंवा गुवाहाटी (5 AFSB) पैकी कोणत्याही ठिकाणी AFSB चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.
हवाई दलाची सामायिक प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. पहिली परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेतली जाते. तर दुसरी परीक्षा मे-जूनमध्ये होते. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतात.
(वाचा : DBSKKV Recruitment 2023: चौथी पास उमेदवारांनाही अर्ज करता येणार; राज्याच्या ‘या’ कृषि विद्यापीठात नवीन भरती सुरु)