अशाप्रकारे चालेल सिस्टम
Google नुसार ही सिस्टम एक्सेलेरोमीटरचा सिस्मोग्राफप्रमाणे वापर करेल आणि फोनला एक मिनी भूकंप डिटेक्टरमध्ये रूपांतरित करेल. जेव्हा तुमचा फोन चार्ज होत असेल आणि हलत नसेल तर तो भूकंपाची सूक्ष्म कंपने डिटेक्ट करू शकतो. जर अनेक फोन्समध्ये एकाच वेळी भूकंपाचा अलर्ट आल्यास Google च्या सर्वरला ह्याची माहिती मिळेल की भूकंप येत आहे आणि तो कुठे येतोय आणि त्याची तीव्रता किती आहे.
हे देखील वाचा: १०० रुपयांच्या आत Airtel चा नवा प्लॅन, युजर्सना डेटासह मिळणार मोफत म्यूजिकचा अॅक्सेस
Google चा सर्वर आजूबाजूच्या फोन्सना अलर्ट पाठवतो. हे अलर्टस दोन श्रेणीत विभागले जातात. पहिला ‘सावध राहा अलर्ट’ जो ४.५ पेक्षा कमी तीव्र भूकंपाच्या वेळी पाठवला जातो. दुसरा टेक अॅक्शन अलर्ट आहे जो ४.५ किंवा त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त तीव्र भूकंपाच्या वेळी पाठवला जातो.
जर त्यापेक्षा जास्त तीव्र भूकंप आला तर ही सिस्टम डू नॉट डिस्टर्ब सेटिंग्स देखील बायपास करते आणि स्क्रीन ऑन करते. तसेच मोठा आवाज होतो. ह्या अलर्टमध्ये युजर्सना सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती दिली जाते.
हे देखील वाचा: मोटोरोलाचा स्वस्त आणि मस्त फोन आला नव्या रंगात, किंमत आहे फक्त ६,७४९ रुपये
Android Earthquake Alerts ऑन करण्याची पद्धत
- फोनच्या सेटिंग्समध्ये जा किंवा Safety & emergency वर टॅप करा.
- त्यानंतर Earthquake alerts वर टॅप करा.
- जर तुम्हाला Safety & emergency पर्याय दिलासा नाही तर Location वर टॅप करून Advanced वर जा. त्यांनतर Earthquake alerts वर टॅप करा.
- त्यानंतर हा पर्याय ऑन करा.