परंतु ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे बोलण्याइतके सहज आणि सोपे नाही. उराशी कितीही ध्यास असला, ध्येय समोर असले तरी या परीक्षसाठी प्रचंड मोठी स्पर्धा असते. त्यामुळे एकीकडे परीक्षेची उच्च काठिन्यपातळी आणि दुसरीकडे लाखो तरुणांचा या परीक्षेतील सहभाग, यामुळे स्पर्धा परीक्षा ही खूपच आव्हानात्मक होऊन बसली आहे. अनेकांना यातून अपयशही पाचवावे लागते. पण काही ध्येयवेडे असे असतात जे परीक्षा उत्तीर्ण करून एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवत असतात.
अशीच गोष्ट आहे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत ‘आयपीएस’ झालेल्या अंशिका वर्मा हिची. आपले बी.टेक चे शिक्षण पूर्ण करून अवघ्या दुसर्या प्रयत्नातच तिने यश संपादन केले. अशा अंशिका वर्मा ही यशोगाथा अनेकांना प्रेरणादायी ठरू शकते.
(वाचा: TIFR Mumbai Recruitment 2023: टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांची भरती, जाणून घ्या नोकरीची सविस्तर माहिती..)
अंशिकाने नोएडा येथील शाळेतून एलिमेंटरी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने येथीलच गलगोटीया कॉलेज ऑफ इंजिनिअरींग एण्ड टेक्नॉलॉजीमधून २०१४ ते २०१८ दरम्यान इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन हा विषय घेऊन आपले इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करत बी.टेक ही डीग्री मिळविली. इंजिनियरिंगला असतानाच तिने स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला होता. त्यामुळे तिने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण होताच जोरदार अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे यासाठी तिने कोणताही क्लास लावला नाही, की मोठाल्या प्रशिक्षण संस्थामध्ये सहभाग घेतला नाही. तिने केवळ वैयक्तिक अभ्यासवर भर देत यूपीएससी परीक्षा दिली आणि दुसर्याच प्रयत्नात २०२० मध्ये ती आयपीएस झाली.
अंशिकाने उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथून युपीएससीची तयारी सुरु केली. तिने युपीएससी सिव्हील सर्व्हीस एक्झामसाठी तयारी केली होती. या परीक्षेत तिला ऑल इंडीया रॅंक ( AIR ) १३६ मिळाला आणि ती आयपीएस झाली. अंशिका ही उत्तर प्रदेश कॅडरची २०२१ च्या बॅंचच्या आयपीएस अधिकारी आहे. सध्या ती उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एसीपी या पदावर रुजू आहे. अंशिकाही अत्यंत सामान्य घरातली मुलगी असून केवळ जिद्दीच्या जोरावर तिने घेतलेली हि यशाची भरारी अनेकांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा ठरू शकते.
(वाचा: NCL Recruitment 2023: ‘नॉर्दन कोलफील्ड’ अंतर्गत एक हजाराहून अधिक पदांची महाभरती! तातडीने करा अर्ज..)