पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल पदाची भरती! चुकूनही चुकवू नका संधी..

तुम्ही वाणिज्य शाखेतून पदवीसह उच्च शिक्षण घेतले आहे आणि लेखापाल/अकाऊंटंट पदाच्या नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत पुणे जिल्हा न्यायालय येथे भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत ‘लेखापाल’ पदाची ०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नुकतीच याबाबत अधिकृत अधिसूचना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने जाहीर करण्यात आली. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून ०५ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठीची शैक्षणिक पात्रता, वय, वेतन आणि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

‘पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती २०२३’ मधील पद आणि पात्रता:
लेखापाल – ०१ जागा
एकूण पदसंख्या – ०१

शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त वाणिज्य पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण. लेखापाल पदासाठी आवश्यक असणारी सर्व संगणक कौशल्ये पारंगत असणे आवश्यक. तसेच मराठी आणि इंग्रजी टंकलेखन अधिसूचनेत नमूद केलेल्या वेगापेक्षा कमी नसावे.

(वाचा: इंजिनिअर झालेल्या ‘या’ मुलीने दुसर्‍याच प्रयत्नात केली यूपीएससी क्रॅक! वाचा अंशिका वर्माचा प्रेरणादायी प्रवास..)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आवार, नविन इमारत, शिवाजीनगर, पुणे ४११००५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ ऑक्टोबर २०२३

वेतन: मासिक २५ हजार.

या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करवे.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना तुम्ही या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.

अर्ज कसा करावा: सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. शेवटच्या तारखेनंतर म्हणजेच ०५ ऑक्टोबर २०२३ नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: TIFR Mumbai Recruitment 2023: टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांची भरती, जाणून घ्या नोकरीची सविस्तर माहिती..)

Source link

accountant job vacancyCareer NewsCareer News In Marathigovernment jobsJob Newspune district courtPune District Court Bharti 2023pune district court recruitment 2023pune district Legal Services Authority jobsPune Jobs
Comments (0)
Add Comment