नारायण राणेंचा निषेध करीत जळगावात डुक्करांना बांधल्‍या राणेंच्‍या प्रतिमा

*(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)*

जळगाव:भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या स्तराचे अपशब्द वापरत अवमान केला. त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असून जळगाव महानगर शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात वराहांना(डुक्‍कर) प्रतिमा बांधून निषेध करण्यात आला. तसेच शिवसैनिकांकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.
राज्यात सर्वत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निषेध नोंदवला जात आहे. वेगवेगळ्या घोषणाबाजी नारायण राणेंच्या विरोधात केल्या जात आहेत.
नारायण राणे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यामधील शिवसैनिक आक्रमक होऊन नारायण राणे यांच्या विरोधातअनेक ठिकाणी गुन्‍हा दाखल करण्यात आले असून जळगावात देखील गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
राज्‍यात नारायण राणे यांच्‍या वक्‍तव्‍याचा तिव्र निषेध नोंदविला जात असून हरेक ठिकाणी शिवसैनिक आक्रमक होत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. त्‍यानुसार शिवसेना जळगाव महानगरच्‍यावतीने शहरातील टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. येथे शिवसैनिकांनी वराह(डुक्‍करे) आणून त्‍यांस नारायण राणे यांच्‍यासह त्‍यांच्‍या मुलांच्‍या प्रतिमा बांधून निषेध करण्यात आला.धुळ्यात देखिल ‘या नार्याचे करायचे काय..?, असे म्हणत शिवसैनिकांकडून प्रतीकात्मक प्रेतयाञा काढण्यात आली.राणे यांचे राजकारण हे डुकरांप्रमाणे गलिच्‍छ असल्‍याचे यातून दाखविण्यात आल्‍याचे गजानन मालपुरे यांनी यावेळी सांगितले.

Comments (0)
Add Comment