(फोटो सौजन्य :- Ashok Gujjar Youtube)
आयएएस कार्तिक जिवानी अशी त्याची सध्याची ओळख. या बहद्दराने आपल्या आवडीचे पद मिळवण्यासाठी आधी मिळालेली २ पदे सोडली आणि शेवटी मनासारखे पद मिळल्यानंतरच हा तरुण शांत बसला.आयुष्यात काही झाले तरी हार न मानणार्या IAS Kartik Jivani यांनी त्यावेळीही या परीक्षेच्या बाबतीत असाच दृढ निश्चय मनाशी बाळगला. त्यांनी एकदा नव्हे तर तीनदा पास होऊन अखेर आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. लाखो मुले या परीक्षेला बसतात, पण भाग्यवान मोजकेच उमेदवार यामध्ये विजयी होतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये UPSC परीक्षा घेतली जाते. या तिन्ही फेर्यांमधून यशस्वीपणे उत्तीर्ण होणार्याला सरकारी खात्यात आणि देशसेवेची संधी मिळते.
गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असलेल्या कार्तिकने विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने JEE मेन परीक्षेला बसून आयआयटी मुंबईमध्ये (IIT Bombay) प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्याने नागरी सेवा परीक्षा देण्याचे ठरवले. मात्र, पहिल्याच प्रयत्नानंतर चांगली तयारी करूनच सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसणे योग्य ठरेल, हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने त्या दृष्टीने अभ्यास केला.
२०१७ ला पहिल्यांदा परीक्षेत यश :
कार्तिकने नागरी सेवा परीक्षेची जोरदार तयारी केली. कठोर परिश्रमानंतर, कार्तिकने २०१७ मध्ये प्रथमच नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळवले. यावेळी तो AIR 94 (All India Rank 94) मिळवून देशातून ९४ वा आला. तो देशाच्या पोलिस दलात सर्वश्रेष्ठ IPS पदावर रुजू झाला. मात्र एवढ्यावर कार्तिक तो समाधानी झाला नाही. त्याने पुन्हा अभ्यासास सुरुवात केली. २०१९ मध्ये तो पुन्हा एकदा परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि आणि यावेळी AIR 84 (देशातून ८४ वा) क्रमांक मिळवला.
IAS बनणे हेच होते अंतिम ध्येय :
कार्तिकचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्याने अभ्यास सुरु केला. दरम्यान त्याचे आयपीएस पदासाठी प्रशिक्षणही सुरु होते. अभ्यासासाठी १५ दिवसांची रजा घेऊन तो आपल्या घरी आला. सुट्टीच्या दिवसात दररोज १० तास अभ्यास केला. २०२० मध्ये कार्तिक पुन्हा परीक्षेला बसला. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे त्याने ही परीक्षाही उत्तीर्ण केली. संपूर्ण भारतातून ८ वा क्रमांक मुळवून IAS होण्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले.
IAS कार्तिक सांगतात…
परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर शिस्तबद्ध असणे खूप गरजेचे आहे. ज्या विषयावर तुमची पकड मजबूत आहे त्या विषयची आधी तयार करा. सोबत, बाकीच्या विषयांची माहिती गोळा करा आणि आवडीने अभ्यास करा. जर तुम्हाला आयएएस परीक्षेची तयारी करायची असेल तर दररोज किमान ७ ते ९ तास अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.