ईसीजी रिडींग देणारा भन्नाट फिटनेस बँड लाँच; किंमतही जास्त नाही

फिटबिटनं नवीन Fitbit Charge 6 बँड लाँच केला आहे. ह्यात १.०४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं डिजाईन जास्त बदलली नाही. चार्ज ५ प्रमाणे दिसणाऱ्या नवीन चार्ज ६ बँडमध्ये नवीन हॅप्टिक बटन देण्यात आलं आहे. चार्ज ६ मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स आहेत, ज्यात हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटरिंग आणि टेम्परेचर सेन्सरचा समावेश आहे. विशेष म्हणजे नवीन बँडमध्ये युट्युब म्यूजिक, गुगल मॅप्स आणि वॉलेट सारख्या सेवा वापरता येतात.

Fitbit Charge 6 ची किंमत

फिटबिट चार्ज ६ जागतिक बाजारात १६० डॉलर्समध्ये लाँच करण्यात आला आहे, ही किंमत सुमारे जवळपास १३,३०० भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा ब्लॅक बँड विद ब्लॅक केस, रेड बँड विद गोल्ड केस आणि व्हाइट बँड विद सिल्व्हर केस कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: iPhone 15 नव्हे तर ‘हा’ असेल सर्वात स्वस्त नवा अ‍ॅप्पल मोबाइल; डिजाईन व फीचर्स लीक

Fitbit Charge 6 मधील फीचर्स

नवीन फिटबिट चार्ज ६, गुगल अ‍ॅप्स आणि गुगल मॅप्स आणि वॉलेट सारख्या सर्व्हिसेस सह येतो. यात १.०४ इंचाचा डिस्प्ले आहे. अन्य फिटनेस ट्रॅकर आणि स्मार्टवॉच प्रमाणे चार्ज ६ देखील ५० मीटर पर्यंत वॉटर रेजिस्टंट आहे. चार्ज ६ एकदा चार्ज केल्यावर सात दिवसांची बॅटरी लाइफ देतो. हा ४० पेक्षा जास्त वर्कआउट मोड देखील ट्रॅक करू शकतो, ज्यात HIIT, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्नोबोर्डिंग सारख्या २० नवीन ऑप्शनचा समावेश आहे.

ह्यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट ट्रॅकर आणि टेम्परेचर सेन्सर असे अनेक हेल्थ फिचर मिळतात. हा बँड स्ट्रेस देखील मोजू शकतो, तसेच ईसीजी आणि ईडीएची रीडिंग देखील दाखवू शकतो. फिटबिटनुसार, HIIT वर्कआउट, स्पिनिंग आणि रोइंग सारख्या अ‍ॅक्टिव्हिटी दरम्यान हार्ट रेट ट्रॅकिंग चार्ज ५ च्या तुलनेत ६०% जास्त अचूक आहे.

तसेच ह्यात गुगल मॅप्सचा वापर करण्यासाठी जीपीएस आणि ग्लोनासचा सपोर्ट आणि गुगल वॉलेटसाठी एनएफसीचा सपोर्ट देखील आहे. ह्यात एक युट्युब म्यूजिक अ‍ॅप देखील मिळतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनगटावरूनच गाणी प्ले/स्टॉप आणि स्किप करू शकता.

हे देखील वाचा: Amazon Sale: स्मार्ट टीव्हीवर दमदार डील्स, सेलपूर्वीच समोर आल्या ऑफर्स

चार्ज ६ चा उपयोग करण्यासाठी, युजर्सकडे एक गुगल अकाऊंट आणि एक फिटबिट अ‍ॅप असणं आवश्यक आहे. फिटनेस ट्रॅकर अँड्रॉइड ९.० आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या डिवाइसेससह iOS 15 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या iPhone सह चालू शकतो.

Source link

fitbitfitbit charge 6fitbit charge 6 launchfitbit charge 6 pricenew fitbitफिटबीट चार्ज ६
Comments (0)
Add Comment