Ulefone Armor 24 रगेड फोनची किंमत
Ulefone Armor 24 रगेड फोनची किंमत ३४,४०१ रुपये ठेवण्यात आलेली आहे. हा फोन सध्या अली एक्सप्रेसवर लिस्ट झाला आहे. परंतु भारतीय उपलब्धतेबाबत कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
हे देखील वाचा: Amazon Sale: स्मार्ट टीव्हीवर दमदार डील्स, सेलपूर्वीच समोर आल्या ऑफर्स
मजबूत बॅटरी आणि इमर्जन्सी लाइट
Armor 23 Ultra नंतर Ulefone Armor 24बाजारात आला आहे. फोनमध्ये एक साइड बटन आहे ज्याचा वापर करून तीन लेव्हलवर रियर लॅम्पची ब्राइटनेस कंट्रोल करण्यासाठी करता येईल. हा फोन ६वॉटची बीम देण्याच्या कपॅसिटीसह येतो. Ulefone Armor 24 मध्ये २२,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ६६ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी ७ दिवसापर्यंतची पावर देते आणि ही १०वॉट चार्जिंग देणाऱ्या पावर बँकेप्रमाणे काम करू शकते.
Ulefone Armor 24 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Ulefone Armor 24 मध्ये ६.७८ इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रेजोल्यूशन १०८० x २४६० पिक्सल, अॅस्पेक्ट रेशियो २०.५:९ आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह येतो. ह्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये १२जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे, ज्यात रॅम १२ जीबी पर्यंत वर्च्युअली वाढवता येतो.
हे देखील वाचा: ईसीजी रिडींग देणारा भन्नाट फिटनेस बँड लाँच; किंमतही जास्त नाही
ह्या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि ६४ मेगापिक्सलचा नाइट व्हिजन कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन ४जी/एलटीई मोबाइल कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळतो. पावरफुल लाइट सिस्टम, पावर बँक फंक्शनेलिटी आणि रगेड डिजाइन सारखे फीचर्ससह यूलेफोन आर्मर २४ मध्ये मिळतात.