६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ८जीबी रॅम; Vivo Y200 स्मार्टफोनचे फीचर्स लाँचपूर्वीच लीक

Vivo लवकरच आपला नवीन Y-सीरीज स्मार्टफोन, Y200 म्हणून लाँच करू शकते. ह्या स्मार्टफोनबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, परंतु लीक ट्रेनिंग मटेरियलवरून अंदाज लावला जात आहे की हा स्मार्टफोन लवकरच बाजारात येईल. तसेच ह्या मटेरियलमधून प्रमुख स्पेसिफिकेशन्ससह फोनच्या डिजाइनची माहिती देखील मिळाली आहे.

लीक झालं ट्रेनिंग मटेरियल

TheTechOultlook नं आगामी Vivo Y200 चं ट्रेनिंग मटेरियल लीक केलं आहे, त्यामुळे फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि ह्याच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. त्यामुळे समजले आहे स्मार्टफोन 2D ग्लास रियर पॅनलसह येईल बाजारात येईल आणि ह्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल.

हे देखील वाचा: ईसीजी रिडींग देणारा भन्नाट फिटनेस बँड लाँच; किंमतही जास्त नाही

तसेच Vivo Y200 मध्ये ६.६७-इंचाचा FHD+ AMOLED अल्ट्रा व्हिजन डिस्प्ले असेल, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ह्यात ३८ टेम्प्रेचर लेव्हलसह सटीक कलर कंट्रोल मिळणार असल्याचा उल्लेख आहे. कॅमेरा पाहता, ह्यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल आणि त्याचबरोबर सेटअपमध्ये एक २ मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा मिळेल. फ्रंटला एक १६ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.

Vivo Y200 स्मार्टफोन Snapdragon 4 Gen 1 चिपसेटवर चालेल आणि Android 13 आधारित Funtouch OS १३ वर चालेल. चिपसेटसह ८जीबी रॅम मिळेल, जो स्टोरेजचा वापर करून व्हर्च्युअली आणखी ८जीबी वाढवता येईल. फोनमध्ये १२८ जीबीची स्टोरेज मिळेल.

हे देखील वाचा: २२०००एमएएचची राक्षसी बॅटरी, भल्यामोठ्या एलईडी फ्लॅश लाइटसह Ulefone Armor 24 रगेड स्मार्टफोन लाँच

ह्या माहितीनुसार, Vivo Y200 मध्ये ४८०० एमएएचची बॅटरी असेल, जो ४४ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याची जाडी ७.६९ मिमी आणि वजन फक्त १९० ग्राम असेल. सध्या ह्या स्मार्टफोनच्या किंमत आणि लाँच डेटची Vivo कडून कोणतीही माहिती समोर आली नाही.

Source link

vivovivo y200vivo y200 launchvivo y200 pricevivo y200 specificationvivo y200 training material
Comments (0)
Add Comment