हडपसर नगरीचा अनोखा असा गणपती सोहळा


हडपसर नगरीचा अनोखा असा गणपती सोहळा

तेज पोलीस टाइम्स  : परवेज शेख 

सालाबाद प्रमाणे दरवर्षीच गणेशोत्सव साजरा होत असतो परंतु यावर्षीचा गणेशोत्सव विशेषता हडपसरकरांचा गणेशोत्सव एकदम अनोखा वेगळा नाविन्यपूर्ण व कौतुकास पात्र ठरला ,यावर्षी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र शेळके साहेब यांनी गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक मंडळाची हडपसर परिसरामध्ये दोन ठिकाणी मीटिंग घेतल्या त्या मिटींगला हडपसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 300 पेक्षा जास्त मंडळांनी हजेरी लावली ,पोलिसांनी आपली भूमिका तसेच मंडळांनी त्यांच्या अडीअडचनी एकमेकांशी चर्चा करून एकमेकांच्या कानी घातल्या गणेशोत्सव काळामध्ये उत्सव उत्साह मध्ये आनंद मध्ये पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मदतीचा आवाहन केलं त्यानुसार ससाणे नगर रोड ,काळे बोराटे नगर परिसर ,हडपसर गावठाण मधील गणेश मंडळे , गाडीतळ- सातववाडी-गोंधळे नगर- 15 नंबर -आकाशवाणी -सासवड रोड आणि सोलापूर रोडवरील सर्व मंडळे ,माळवाडी -साडे सतरा नळी मधील मंडळे-मगरपट्टा रोडवरील मंडळे- इत्यादी सर्वांच्या विसर्जन मिरवणुकांची माहिती श्री रविंद्र शेळके यांनी मंडळांकडून घेतली तसेच हडपसर ट्राफिक डिव्हिजनचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेतही पाहणी दौरा केला व सर्व मंडळांच्या मिरवणुकांसाठीचा रूट ठरवून घेतला ,दरम्यानच्या काळामध्ये श्रीरंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग ,

श्री विक्रांत देशमुख साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 तसेच
सौ अश्विनी राख सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग यांच्याही वेळोवेळी पाहणी दौरे झाले या सर्व पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे -मारुती तुपे सुनील बनकर -सुभाष जंगले – निलेश दादा मगर प्रमोद नाना भानगिरे यांच्या समवेत पाहणी व चर्चा केली तसेच सर्वांच्या सूचनांचा मागणीचा आदर ठेवून ससाणे नगर रस्ता दहाव्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून काळे कॉलनी पासन वाहतुकीस बंद करून सदरचा रस्ता काळे बोराटे नगरच्या बाजूने वळवण्यात आला त्यामुळे तत्यामुळे ससाणेनगरची वाहतूक कोंडी टाळली व त्याचा फायदा असा झाला की रेल्वेपासून ससाणेनगरच्या कॅनाल पर्यंत दक्षिण-उत्तर लांबीचा सुमारे १ किलोमीटरचा 80 फूट स्वर्गीय सरपंच दत्तात्रय देवराम ससाणे मार्ग गणेश मंडळांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला त्यामुळे ससाणेनगर पंचक्रोशीतील हजारो नागरिक बंधू-भगिनी लहान मुले वडीलधारी माणसं आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच बहुसंखेनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाली व त्या मिरवणुकीचा आनंद घेतला . रस्ता बंद असल्यामुळे कसलीही वाहतूक वाहतुकीचा अडथळा आला नाही त्यामुळे निर्धास्तपणे ज्याप्रमाणे पुणे शहरांमध्ये लक्ष्मी रोड वरून मिरवणूक जातात त्याचप्रमाणे या मार्गावरून मिरवणुकांचं जल्लोषा मध्ये प्रस्थान झालं अनेक नागरिकांनी वडीलधाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे व मारुती तुपे यांचे मिरवणुकी दरम्यान आभार मानले की हा अनोखा प्रयोग केल्यामुळे मुख्य रस्त्याला की ज्याचं नाव *सरपंच स्वर्गीय सरपंच दत्तात्रय देवराम ससाणे मार्ग *आहे त्याला पुण्यातील लक्ष्मी रोड सारखा उत्सव काळातील स्वरूप आले परंतु आम्ही नागरिकांना सांगू इच्छितो की सदर रस्ता बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्यामुळे हे सर्व शक्य झालं त्यामुळे ससाणेनगर मधील सर्व रहिवाशांच्या वतीने मी श्री रवींद्र शेळके व त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो .


हे सर्व करत असताना पुणे महानगरपालिकेतर्फे हडपसर प्रभाग क्र २३ मघील परिसरामध्ये सुमारे ८ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली होती, त्या सर्व ठिकाणी हजारो नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले ! तसेच स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांनी ससाणे नगर कॅनाल वर तसेच ससाणे नगर येथील सूर्यमुखी गणेश मंदिरा शेजारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या जवळ मूर्ती संकलन केंद्र चालू ठेवले होते त्यामध्ये साधारण ११०० पेक्षा जास्त गणेश भक्तांनी मूर्तींचे विसर्जन केले .
तसेच मारुती तुपे यांनी काका हलवाई दुकानासमोर मूर्ती संकलन केंद्र चालू ठेवले होते त्या ठिकाणी सुद्धा सुमारे 400 मुर्त्या नागरिकांनी विसर्जित केल्या . एकंदरत पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री विकास ढवळे पाटील व त्यांच्या टीमला तसेच स्थानिक सर्व नगरसेवक व पोलीस प्रशासन या सर्वांच्या संयुक्त परिश्रमामुळे हडपसर परिसरातील गणेश उत्सव आनंदाने उत्साहामध्ये आणि सुरक्षित पार पडला यापूर्वी अनेक वर्ष ससाणे नगर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी विसर्जना दिवशी बंद व्हावा अशी मागणी योगेश ससाणे करत होते परंतु प्रशासनाकडून त्याबाबत योग्य ती कार्यवाही झाली नव्हती परंतु यावर्षी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके त्यांच्याबरोबर असणारे श्री विश्वास दगडे पोलीस निरीक्षक गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर


श्री संदीप शिवले पोलीस निरीक्षक गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
श्री अविनाश शिंदे पोलीस उपनिरीक्षक तपास पथक हडपसर पोलीस स्टेशन
श्री दिनेश शिंदे साहेब पोलीस फौजदार हडपसर पोलीस स्टेशन श्री राहुल मोकाशी पोलीस हवालदार हडपसर पोलीस स्टेशन
श्री सुनील हनवते पोलीस नाईक हडपसर पोलीस स्टेशन
सौ परवीन सय्यद महिला पोलीस नाईक
श्री उमेश शेलार पोलीस अंमलदार गोपनीय विभाग हडपसर पोलीस स्टेशन यांच्यासह
श्री बजरंग धायगुडे साहेब पोलीस अधिकारी काळेबोराटे नगर पोलीस चौकी
तसेच २० पोलीस मित्र
५ होमगार्ड
150 पोलीस अमलदार
25 स पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक या सर्वांच्या टीमला एकूणच हडपसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणारा मोठा परिसर व त्यामधील 300 पेक्षा जास्त गणेश मंडळांना विश्वासात घेऊन एक चांगल्या प्रकारचा अनोखा कौतुकास्पद गणेशोत्सव सोहळा पार केला सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏
आपला नम्र योगेश दत्तात्रय ससाणे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका

Comments (0)
Add Comment