तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
Pune: अनंत चतुर्थी आणि महमद पैगंबर जयंती एकाच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी आल्याने मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंती उत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी शहरातून महमद पैगंबर जयंती मिरवणूक निघणार असून त्यावेळी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी मिरवणुक जाते वेळी नमुद मिरवणूक मार्गाचा वापर न करता खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन देखील केले आहे.
मुख्य मिरवणूक मार्ग
मार्ग – मनुशाह मशिद, 482 नानापेठ पुणे येथून मुख्य मिरवणूकीस सुरुवात होते व ती मिरवणूक संतकबीर चौक – ए.डी.कॅम्प चौक डावीकडे वळून भारत सिनेमा पद्मजी पोलीस चौक – निशांत सिनेमा – उजवीकडे वळून
भगवानदास चाळ – चुडामन तालीम चौक – मुक्तीफौज चौक – डावीकडे वळून कुरेशी मशिदीचे मागील जॉन महंमद रोडने बाबाजान दर्गा चौक – चारबावडी पोलीस चौकीचे पाठीमागून शिवाजी मार्केट ते सेंट्रल स्ट्रीट रोडने – भोपळे चौक – गांव कसाब मशिद समोरुन मुक्तीफौज चौक ते पुलगेट चौक, डावीकडे महात्मा गांधी रोडने (15 ऑगस्ट चौक) महमंद रफी चौक- कोहीनूर हॉटेल चौक- महावीर चौक -डावीकडे वळून साचापीर स्ट्रीटने महात्मा फुले चौक – संत कबीर चौक – नानाचावडी चौक – अल्पना सिनेमा ते हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने सरळ गोंविद हलवाई चौक – सुभानशहा दर्गा चौक – सिटीजामा मशिद शुक्रवार पेठ याठिकाणी मिरवणुकीची सांगता होणार आहे.
या मिरवणुक मार्गावर व या मार्गाला मिळणारे उप रस्ते व गल्ल्यांचे तोंडापासून आतील बाजूस
100 मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी करण्यात येत आहे. तसेच मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मिरवणूक वेळेच्या कालावधीत बंदी करण्यात येत आहे. वरील वाहनचालकांनी नागरिकांनी मिरवणुक जाते वेळी नमुद मिरवणूक मार्गाचा वापर न करता खालीलपर्यायी मार्गाचा वापर करावा.
पर्यायी मार्ग –
1. मिरवणुक सुरु होताना रास्ता पेठ पॉवर हाऊस ते संत कबीर चौक अशी जाणारी वाहतूक रास्ता पेठ – समर्थ
पोलीस स्टेशन – क्वाटरगेट मार्गे सोडण्यात येईल.
2. मिरवणूक संत कबीर चौकात आल्यानंतर क्वार्टर गेट कडून संत कबीर चौकाकडे वाहने न सोडता ती पुन्हा
सायकल कॉलनी, डावीकडे वळून समर्थ पोलीस स्टेशन पुढे रास्ता पेठ, पॉवर हॉऊस, के.ई.एम. हॉस्पीटल,
अपोलो सिनेमा मार्गे सोडण्यात येईल.
3. मिरवणुक संत कबीर चौकात असे पर्यंत नाना पेठेतून लक्ष्मी रोडने येणारी वाहने नाना चावडी चौकातून
वळविण्यात येतील. ती वाहने रास्ता पेठ पॉवर हाऊस मार्गे इच्छितस्थळी जातील.
4. मिरवणूक पद्मजी पोलीस चौकी चौकात आल्यानंतर क्वार्टरगेट कडून त्या दिशेला वाहने न सोडता ती संतकबीर
चौक मार्गे वळविण्यात येतील.
5. मिरवणुक ए. डी. कॅम्प चौकातून भारत सिनेमा गल्लीत वळल्यानंतर पद्मजी पोलीस चौकी चौक ते ए.डी. कॅम्प
चौकाकडे वाहतूक न सोडता ती क्वार्टर गेटकडे (जुना मोटार स्टॅण्डकडे) वळविण्यात येईल.
6. मिरवणुक पद्मजी चौक ते निशांत सिनेमा दरम्यान असताना समोरुन येणारी वाहतूक कॅम्प हायस्कूल जवळून
वळविण्यात येईल.
7. मिरवणूक चुडामन तालीम चौकाकडे जाताना त्या दिशेने जाणारी वाहने सरळ पुलगेट मार्गे किंवा जुना मोटार
स्टॅण्ड मार्गे वळविण्यात येतील.
8. कॅम्प येथील वाय जंक्शन वरुन एमजी रोडकडे येणारी वाहतुक ही वाय जंक्शन येथे बंद करुन ती खाणे मारुती
चौक येथे वळविण्यात येईल. (या ठिकाणावरील वाहतुकीची परिस्थिती पाहून सकाळी 9 वा. पासून
डायव्हर्शन करण्यात येईल.)
9. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक ही बंद करण्यात
येणार आहे. (सदर ठिकाणावरील वाहतुकीची परिस्थिती पाहून सकाळी 9 वा. पासून डायव्हर्शन करण्यात
येईल.)
10. मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशिदकडे जाणारी वाहतुक ही बंद करुन येथील वाहतुक ही चुडामन तालिमकडे
वळविणेत येईल.
11. व्होल्गा चौकाकडून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून ही वाहतुक सरळ
ईस्ट स्ट्रिट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
12. महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून तेथील वाहतुक एमजी
रोडने नाझ चौकाकडे वळविण्यात येईल.
13. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून येथील वाहतुक ताबुत
स्ट्रीट रोड मार्गे पुढे सोडण्यात येईल.
14 बाबाजान चौकाकडून भोपळे चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक शिवाजी
मार्केटकडे वळविण्यात येईल.
15. बाबाजान चौकाकडून कुरेशी मशिदकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून ही वाहतुक निशांत
टॉकीजकडे वळविण्यात येईल.
16. शिवाजीमार्केट कडून सेंटर स्ट्रीट चौकीकडे जाणारी वाहतुक तसेच कोळसा गल्लीकडून एमजी रोडकडे जाणारी
वाहतुक ही आवश्यकत्तेनुसार बंद करण्यात येणार आहे.
17. गोविंद हलवाई चौक ते सुभानशहा दर्गा या मार्गावर मिरवूणक असताना गोटीराम भैय्या चौकाकडून गोविंद
हलवाई चौकाकडे येणा-या वाहन चालकांनी गोटीराम भैय्या चौक – गाडीखाना – फुलवाला चौक – व पुढे सरळ
महाराणा प्रताप रोडने मिठगंज चौकीकडे जाणारे रस्त्याचा वापर करावा.
18 मिरवणूक सोन्या मारुती चौक ते संतरजीवाला चौक ते मदर छल्ला मशिद या दरम्यान असताना सर्व प्रकारचे
वाहनांकरीता लक्ष्मी रोडवरील हा भाग बंद राहणार असल्याने वाहनचालकांनी नानापेठ पोलीस चौकी पासून
उजवीकडे वळून दारुवाला पुल डावीकडे वळून देवजीबाबा चौक सरळ फडके हौद चौक जिजामाता चौक या
पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच लक्ष्मी रोडने दक्षिण भागात जाणारे वाहनचालकांनी हमजेखान चौक- महाराणा प्रताप रोडने पुढे इच्छितस्थळी जावे.
19. हडपसर कडून येणारे वाहनचालकानी भैरोबानाला चौक, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौक, वखार महामंडळ चौक, सेव्हन लव्हज चौक या मार्गाचा तसेच भैरोबानाला चौक, सोपानबाग चौक, टर्फ कल्ब चौकातून अर्जुन रोडने लष्कर भागातून इच्छित स्थळी जावे. तसेच मम्मादेवी चौक येथे येणा-या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाता येणार नसून त्यांनी मम्मादेवी – कंमाड हॉस्पीटल – वानवडी बाजार – लुल्लानगर – गंगाधाम चौक – वखार
महामंडळ चौक असे इच्छितस्थळी जावे.
20. स्वारगेट व नेहरू रोडने येणारे वाहनचालकांनी सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ, गंगाधाम चौक, लुल्लानगर चौक, भैरोबानाला चौक या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
याखेरीज मिरवणुकीत सामील होणेसाठी मुंढवा, कोंढवा, फातीमानगर, हडपसर, वानवडी, खडकी वगैरे | भागातून येणारे भाविकांनी मिरवणूकीत सामील करण्यात येणारी आपली वाहने खान्या मारुती चौक ते इंदिरा गांधी चौक या ईस्ट स्ट्रीटवर पुर्वे कडील बाजूस रस्त्यांचे समांतर लावून