भारतीय विद्या भवन पुणे येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या सर्व तपशील..

पुण्यामध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी चालून आली आहे. भारतीय विद्या भवन पुणे यांच्या अंतर्गत शाळा समुपदेशक, उपचारात्मक शिक्षक या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखतीमधून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठीच्या मुलाखती १६ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. तेव्हा या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव आणि पदसंख्या:
शाळेचे समुपदेशक – ०१ जागा
उपचारात्मक शिक्षक – ०१ जागा
एकूण रिक्त जागा – ०२

शैक्षणिक पात्रता:
शाळेचे समुपदेशक – क्लिनिकल सायकोलोजी किंवा कौसलिंग सायकोलोजी या विषयांमध्ये एम. ए. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उपचारात्मक शिक्षक – स्पेशल एज्युकेशन विषयात पदविका किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

(वाचा: HQ Coast Guard Region NW Recruitment 2023: तटरक्षक दलाच्या उत्तर-पश्चिम मुख्यालयात भरती, आजच करा अर्ज!)

अनुभव: दोन्ही पदांसाठी उमेदवारांना संबधित कामाचा किमान २ वर्षे अनुभव असावा.

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे थेट निवड

मुलाखतीचा पत्ता: भारतीय विद्या भवन पुणे केंद्र, शिवाजी नगर.

मुलाखतीची तारीख: १६ ऑक्टोबर २०२३

या भरतीकरिता भारतीय विद्या भवन पुणे केंद्राची अधिकृत वेबसाईट पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर जाहिरात/ अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया: या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी मुलाखतीसाठी भारतीय विद्या भवन यांच्या शिवाजी नगर केंद्रावर उपस्थित राहावे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत मुलाखती होतील. या भरती संदर्भातील शंका-समाधानासाठी ८३७९०४४२५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(वाचा: AIIMS Nagpur Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे विविध पदांची भरती! आजच करा अर्ज…)

Source link

Bharatiya Vidya Bhavan Pune Bharti 2023Bharatiya Vidya Bhavan Pune Recruitment 2023bvb pune bhartibvb pune jobsbvb pune recruitment 2023Career NewsGovernment jobJob Newsschool jobs
Comments (0)
Add Comment