व्हीआयपी सर्व्हिस म्हणजे काय?
फ्लिपकार्टची नवीन पेड सब्सक्रिप्शन सर्व्हिस एक लॉयल्टी प्रोग्राम आहे. ह्या सर्व्हिसची टक्कर अॅमेझॉनशी असल्याची चर्चा आहे. तसेच फ्लिपकार्ट प्लस आणि प्लस प्रीमियम मेंबर पेमेंट आधारित सिस्टम आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर बनण्यासाठी २०० सुपरकॉइन्स आवश्यक आहेत.
हे देखील वाचा: Best Smartphones under 10K: तुमच्या बजेटमध्ये येतील हे स्मार्टफोन्स, फीचर्सही जबरदस्त
नवीन सर्व्हिसचा फायदा काय?
फ्लिपकार्ट विआयपी सर्व्हिसमध्ये युजर्सना ऑर्डर बुक केलेल्या दिवशी किंवा पुढील दिवशी डिलिव्हरी केली जाईल. विआयपी सर्व्हिसमध्ये युजर्सना फ्लिपकार्ट अॅप सेलचा अर्ली अॅक्सेस मिळेल. याचा अर्थ असा की सर्वात आधी स्वस्तात iPhone 15 खरेदी करण्यासाठी तुम्हाला विआयपी सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. व्हीआयपी युजर्स मेंबरशिपमध्ये सेल, फ्री सेम डे डिलिव्हरी, रिटर्न, कस्टमर सपोर्ट आणि एक्स्ट्रा सुपर क्वॉईनची सुविधा मिळेल.
कोणत्या लोकेशनसाठी आहे सर्व्हिस?
ही सर्व्हिस दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकातासह काही निवडक पिन कोडसाठी लागू करण्यात आली आहे. ह्या सर्व्हिसमध्ये ४८ तासांत रिटर्न पिकअपची सुविधा मिळेल. दिल्ली एनसीआर, बंगळुरू, कोलकाता सारख्या शहरांमधील युजर्स सर्व्हिसचा आनंद घेऊ शकतील.
हे देखील वाचा: Jio च्या अडचणी वाढल्या! सर्वात स्वस्त Primebook लॅपटॉप लाँच, ४जी सिमवर चालणार इंटरनेट
किती पैसे मोजावे लागणार?
फ्लिपकार्ट विआयपी एक वार्षिक सब्सक्रिप्शन सर्व्हिस असेल. ह्यासाठी यासाठी युजर्सना ४९९ रुपये द्यावे लातील. अशीच एक सर्व्हिस अमेजॉन प्राइम मेंबरशिप ऑफर देखील देत आहे, जिचे अॅन्युअल सब्सक्रिप्शन ५०० रुपयांचे होते जे आता वाढवून १,४९९ रुपये करण्यात आलं आहे. परंतु प्राइम सब्सस्क्रिप्शनमध्ये फक्त शॉपिंग नव्हे तर मुव्हीज आणि म्युजिक स्ट्रीमिंग सारखी सर्व्हिस देखील मिळते.