अंबानी कुटुंबातील सून श्लोका हिरे उद्योगपती रसेल मेहता आणि मोना मेहता यांची मुलगी आहे. श्लोकाचे वडील ‘रोझी ब्लू (Rosy Blue) या जगातील नंबर वन डायमंड कंपनीचे मालक आहेत. शिक्षणाबद्दल बोलायचे तर श्लोका मेहताने २००९ मध्ये धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी ती अमेरिकेला गेली. तिथे तिने प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून (Princeton University) अँथ्रोपोलॉजीमध्ये (मानववंशशास्त्र) पदवी संपादित केली.
(वाचा : RaghNeeti Education: Scholars असणाऱ्या परिणिती-राघवची लग्नगाठ, दोघेही होते हुशार विद्यार्थी जाणून घ्या या दोघांचे शिक्षण)
त्यानंतर, श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून (London School of Economics and Political Science) कायद्यात पदव्युत्तर पदवी (Masters) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
व्यवसायासोबतच ती सामाजिक कार्याशीही जोडलेली आहे. बिझनेस कंपनी सुरू करण्यापासून श्लोका समाजसेवेत सक्रिय आहे.
तर, श्लोकाचा पती आणि अंबानी घराण्यातील मुलगा आकाश अंबानी हादेखील उच्च शिक्षित आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने परदेशातील विद्यापीठाची निवड केली.
यूएसएमधील USA ब्राऊन युनिव्हार्सिटी (Brown University) मधून इकोनोमिक्स विषयातील तो पदवीधर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात आकाश भारतात परतला. तर, नुकताच म्हणजेच २८ ऑगस्ट २०२३ ला तो इशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यासह रिलायन्स समूहाच्या (Reliance Industries Limited) नॉन-एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर (Non-Executive Director) म्हणून रुजू झाला आहे.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी या दोघांना दोन मुलं आहेत.
(वाचा : Success Story IAS Kartik Jivani: आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तीनवेळा स्पर्धा परीक्षेला बसून तीनही वेळा यशस्वी झाला)