Google ची जागा घेण्याच्या तयारीत Apple; लवकरच येऊ शकतं कंपनीचं सर्च इंजिन

Google ला टक्कर देण्यासाठी Apple आपलं सर्च इंजिन आणण्याचा विचार करत आहे. जगात अनेक सर्च इंजिन आहेत, ज्यात गुगलला पसंती देणाऱ्याची संख्या सर्वाधिक आहे. अनेक डिवाइसवर गुगल सर्च डिफॉल्ट ब्राउजरच्या स्वरूपात वापरला जातो. परंतु अ‍ॅप्पलला थर्ड पार्टी अ‍ॅप्स आणि टेक्नॉलॉजी आपल्या प्रोडक्टवर वापरायला आवडत नाही. त्यामुळे अ‍ॅप स्टोर व्यतिरिक्त आता अ‍ॅप्पल आपलं सर्च इंजिन आणण्याची तयारी करत आहे. चला जाणून घेऊया माहिती.

Google ची जागा घेणार Apple सर्च इंजिन

रिपोर्टनुसार, Apple आपलं स्वतःचं सर्च इंजिन डेव्हलप करत आहे, जे कंपनीच्या डिवाइसवर लोकप्रिय गुगलची जागा घेऊ शकेल. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या रिपोर्टनुसार Apple अनेक वर्षांपासून सर्च टेक्लोनॉजीवर प्रयोग करत आहे.

हे देखील वाचा: Jio च्या अडचणी वाढल्या! सर्वात स्वस्त Primebook लॅपटॉप लाँच, ४जी सिमवर चालणार इंटरनेट

रिपोर्टमधून समोर आलं आहे की, iPhone बनवणारी कंपनीला अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे परंतु जर त्यांची इंटरनल सर्च टेक्नॉलॉजी वर आली तर Apple युजर्स Google च्या तुलनेत जास्त इंटीग्रेटेड आणि प्रायव्हेट सोल्युशन वापरू शकतील.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की अ‍ॅप्पल आधीपासूनच आपल्या काही अ‍ॅप्समध्ये आपल्या सर्च टेक्नॉलॉजीचा छोट्याप्रमाणावर टेस्टिंग करत आहे. Apple चं सर्च स्पॉटलाइट मध्ये दिसत आहे, जे युजर्सना उनके डिवाइसवर गोष्टी शोधण्यास मदत करत आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की काही iOS आणि MacOS व्हर्जनमध्ये आधीपासूनच अ‍ॅप्पलनं वेब सर्च रिजल्ट जोडण्यास सुरुवात केली होती, जे युजर्सना थेट त्या साइटवर घेऊन जातात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. काही वेळा रिजल्ट एक तर मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या बिंग किंवा अल्फाबेट इंकच्या के Google द्वारे पावर्ड होते. सिरी वेब रिजल्ट सादर करण्यासाठी देखील त्या टेक्नॉलॉजी का वापर करतो.

हे देखील वाचा: Flipkart ची नवीन VIP Subscription सर्व्हिस लाँच, स्वस्तात iPhone 15 सह मिळतील अनेक फायदे

जर ही बातमी खरी ठरली तर iPhones, iPads आणि MacBooks सह अनेक Apple प्रोडक्ट मध्ये गुगलच्या जागी अ‍ॅप्पलचं सर्च इंजिन असेल. अद्याप कंपनीनं ह्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. येत्या काळात ह्याबाबत माहिती समोर येऊ शकते.

Source link

appleapple search enginegoogle search enginesearch engineअ‍ॅप्पलअ‍ॅप्पलं सर्च इंजिन
Comments (0)
Add Comment