दूरसंचार विभाग मुंबई येथे भरती सुरु! ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज…

मुंबईकरांसाठी सरकारी नोकरीची एक उत्तम संधी चालून आली आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या दूरसंचार विभाग अंतर्गत द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘ एएओ, सीनियर अकाउंटंट, एमटीएस, एलडीसी, पीएस स्टेनो, स्टेनो’ या पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. या पदांसाठीची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

‘दूरसंचार विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
एएओ ( AAO) – ०१
पीएस स्टेनो गॅझेटेड – ०१
पीएस स्टेनो नाॅन गॅझेटेड – ०१
सीनियर अकाउंटंट – २१
स्टेनो – ०१
एलडीसी (LDC) – १२
एमटीएस (MTS) – ०२
एकूण पद संख्या – ३९

(वाचा: HQ Coast Guard Region NW Recruitment 2023: तटरक्षक दलाच्या उत्तर-पश्चिम मुख्यालयात भरती, आजच करा अर्ज!)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे.

वयोमर्यादा: कमाल वय ५६ वर्षे असावे.

अर्जाची पद्धत: ऑफलाईन.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: दूरसंचार विभाग,द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम. मुंबई- ४०००५४

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२३

या भारती संदर्भात अधिक महितीसाठी ‘द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स’ विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: Bharatiya Vidya Bhavan Pune Bharti 2023: भारतीय विद्या भवन पुणे येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या सर्व तपशील..)

Source link

Career NewsDepartment of Telecommunication jobsdepartment of Telecommunication recruitment 2023Department of Telecommunication vacancyDOT bharti 2023DOT Recruitment 2023Government jobJob News
Comments (0)
Add Comment