पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत ‘आयटी लिपीक’ पदासाठी भरती.. आजच करा अर्ज..

बँकेत नोकरी करण्याचा विचार आहे आणि उत्तम संधीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत आय.टी. लिपिक ( I.T. clerk) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १२ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँकेतील या पदासाठीची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा आणि कुठे पाठवायचा याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव: आय.टी. लिपिक ( I.T. Clerk)

शैक्षणिक पात्रता: बीएससी आयटी (ही जागा केवळ पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहे)

अनुभव: संबधित कामाचा एका वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

(वाचा: HQ Coast Guard Region NW Recruitment 2023: तटरक्षक दलाच्या उत्तर-पश्चिम मुख्यालयात भरती, आजच करा अर्ज!)

अट: ही जागा केवळ मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहे.

नोकरी ठिकाण: पनवेल

वयोमर्यादा: किमान २५ वर्षे ते कमाल ३५ वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: द पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. ४७१, टिळक रोड, कापड बाजार, पनवेल- रायगड – ४१०२०६.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ ऑक्टोबर २०२३

‘द पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक भरती २०२३’ संदर्भात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा: या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्रांसह आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत म्हणजेच १२ ऑक्टोबर २०२३ च्या आत वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

(वाचा: Bharatiya Vidya Bhavan Pune Bharti 2023: भारतीय विद्या भवन पुणे येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या सर्व तपशील..)

Source link

bank bhartiBank Job 2023bank jobs in panvelBank RecruitmentCareer NewsGovernment jobJob NewsPanvel NewsThe Panvel Co operative Urban Bank Bharti 2023
Comments (0)
Add Comment