अँड्रॉइडसाठी नवी ऑपरेटिंग सिस्टम येणार; अशाप्रकारे Google Pixel 8 Series लाँच इव्हेंट बघा लाइव्ह

Google Pixel 8 Series आज होणाऱ्या कंपनीच्या Made by Google इव्हेंटमधून लाँच केली जाईल. ह्या इव्हेंटमध्ये Google Pixel 8 Series सोबतच कंपनी अनेक हार्डवेयर प्रोडक्ट लाँच करेल. हार्डवेयरच नव्हे तर इव्हेंटमध्ये सॉफ्टवेयर संबंधित देखील घोषणा केल्या जातील. गुगल मॅप्स, सर्च इत्यादी गुगल सर्व्हिसेसमध्ये देखील नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. गुगलचा हा इव्हेंट न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ह्याची लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. चला पाहू डिटेल्स.

Google इव्हेंट कुठे लाइव्ह पाहायचा?

Made by Google Event 2023 ची लाइव्ह स्ट्रीमिंग गुगलच्या ऑफिशियल YouTube चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली जाईल. Google Event 2023 आज म्हणजे ४ ऑक्टोबरला संध्यकाळी ७:३० वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरु होईल. तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून थेट प्रक्षेपण पाहू शकता.

हे देखील वाचा: कंप्युटरपेक्षा जास्त रॅम आणि आकर्षक लाल रंगात येतोय OnePlus 11R Solar Red 5G; कंपनीनं केली घोषणा

Google Pixel 8 Series होईल लाँच

ह्या इव्हेंटमध्ये कंपनी Google Pixel 8 Series लाँच करेल. ज्यात Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro चा समावेश आहे. सीरीज आजपासून प्री-ऑर्डरसाठी हे स्मार्टफोन उपलब्ध होतील. ह्यांची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून केली जाईल.

कंपनीनं आधीच साइटवर ह्यांचं एक पेज लाइव्ह केलं आहे. लीक रिपोर्ट्समध्ये स्मार्टफोन्सच्या फीचर्सचा देखील खुलासा झाला आहे. अलीकडेच Pixel 8 Pro चा अनबॉक्सिंग व्हिडीओ देखील लीक झाला आहे, ज्यात फोन स्पष्ट दिसत आहे.

स्मार्टवॉच आणि बड्स देखील होतील लाँच

स्मार्टफोन्स व्यतिरिक्त कंपनी Google Pixel Watch 2 देखील सादर करेल. कंपनीनं कंफर्म केलं आहे की हा भारतात लाँच केला जाईल. स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टवॉचच नव्हे तर, कंपनी ह्या इव्हेंटमध्ये नवीन इअरबड्स देखील सादर करू शकते. कंपनी नवीन कलर ऑप्शनमध्ये Pixel Buds Pro लाँच करू शकते. टीजरमध्ये Porcelain कलरमधील बड्स दिसले आहेत.

हे देखील वाचा: Realme Festive Days Sale: ८ ऑक्टोबरपासून सुरु होईल रियलमीचा धमाकेदार सेल, अशा आहेत सर्व स्मार्टफोन डील्स

Android 14

हार्डवेयरसह कंपनी ह्या इव्हेंटमध्ये स्मार्टफोन्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम (OS) Android 14 देखील लाँच करेल. ज्यात अनेक नवीन आणि दमदार फीचर्सचा समावेश केला जाईल. Google Pixel 8 Series च्या स्मार्टफोन्समध्ये हा अपडेट सर्वप्रथम मिळेल. इतर स्मार्टफोन्समध्ये नजीकच्या भविष्यात हा अपडेट रोल आउट केला जाईल.

Source link

android 14googlegoogle pixel 8google pixel 8 progoogle pixel 8 seriesmade by google event 2023pixel 8pixel 8 pro
Comments (0)
Add Comment