भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांची भरती!

भारतीय लष्करामध्ये काम करण्याची इच्छा असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी चालून आली आहे. भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मुख्यालय अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये मल्टि टास्कींग स्टाफ, वॉशरमन, मजदूर, कुक, गार्डनर अशा पदांचा समावेश आहे. ही भरती पुणे, मुंबई, देवळाली, अहमदनगर या युनिटसाठी घेण्यात येत आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोहोंना अर्ज करता येणार असून या भरतीतील पदे, पद संख्या, पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पाहूया…

‘सदर्न कमांड मुख्यालय २०२३ भरती’ मधील पदे आणि पदसंख्या:
मल्टि टास्कींग स्टाफ (मेसेंजर) – १३ पदे
मल्टि टास्कींग स्टाफ (दफ्तरी) – ३ पदे
वॉशरमन – २ पदे
मजदूर – ३ पदे
मल्टि टास्कींग स्टाफ (गार्डनर) – १ पद
कुक – २ पदे
एकूण पदे- २४

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी उमेदवार १० वी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच संबधित कामाचा उमेदवाराला किमान एका वर्षाचा अनुभव असावा. तर कुक या पदाचा उमेदवार १० वी उत्तीर्ण असण्यासोबतच त्याला भारतीय जेवणाचे / इंडियन कुकिंगचे ज्ञान आणि कामातील कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ तर कमाल २५ वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर एससी/ एसटी वर्गाला ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

(वाचा: UPSC Recruitment: युपीएससी अंतर्गत कंबाईंड जीओ-सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२४ भरती… जाणून घ्या सर्व तपशील…)

वेतन श्रेणी: ‘कुक’ हे पद वगळता इतर सर्व पदांसाठी १८ हजार ते ५६ हजार ९०० ही वेतनश्रेणी लागू आहे. तर ‘कुक’ या पदासाठी १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० ही वेतनश्रेणी लागू आहे. यासह सर्व पदांना अधिक इतर भत्ते दिले जातील.

निवड पद्धती : सर्व पदांची प्रथम लेखी परीक्षा होईल. ज्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता, रिझिनग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन यावर आधारित प्रश्न असतील तर कुक व वॉशरमन पदांसाठी परीक्षेनंतर स्किल/ प्रॅक्टिकल टेस्ट होईल.

अट: उमेदवार एकाच पदासाठी अर्ज करू शकतात. एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास ते बाद केले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ८ ऑक्टोबर २०२३

अर्ज कसा करावा: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत अधोसूचनेत नमूद केलेले सर्व दस्तऐवज जोडणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजे ८ ऑक्टोबर २०२३ आधी सादर करणे गरजेचे आहे.

या भरती संदर्भात अधिक महितीसाठी सदर्न कमांडच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची असल्यास येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: Scholarship Schemes: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणाचा मार्ग सुलभ! शासनाकडून शिष्यवृत्ती जाहीर…undefined)

Source link

Army HQ Southern Command Recruitment 2023army recruitmentCareer NewsGovernment jobhq southern command recrutiment 2023Indian Army Recruitmentindian defence jobsJob News
Comments (0)
Add Comment