वेळापत्रकानुसार, एसएससी जेई २०२३ ची परीक्षा ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे. सदर परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये आयोजित केले जाईल. देशभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर ही भरती परीक्षा घेतली जाईल. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) च्या एकूण १ हजार ३२४ रिक्त जागा भरतीद्वारे भरल्या जातील.
(वाचा : UPSC CDS-2 2023 Result: यूपीएससी सीडीएस-२ लेखी परीक्षेचा निकाल जाहीर; असा तपासात येणार निकाल)
उमेदवारांना पेपर-१ साठी २ तासांचा वेळ दिला जाईल. चाचणीमध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचा समावेश असेल. ज्यामध्ये ५० गुणांचे ५० प्रश्न असतील. याशिवाय, नोंदणी दरम्यान उमेदवारांनी काय निवडले आहे? त्यावर आधारित, सामान्य अभियांत्रिकी – सिव्हिल आणि स्ट्रक्चरल किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल विभागानुसार संबंधित क्षेत्राशी निगडीत १०० गुणांचे १०० प्रश्न असतील. तर दुसऱ्या पेपरमध्ये ३०० गुणांचे एकूण १०० प्रश्न असतील.
एसएससी जेई प्रवेशपत्र याप्रमाणे डाउनलोड करू शकता :
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर जेई अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– तुमचे प्रवेशपत्र समोर दिसेल.
– प्रवेश पत्राची प्रत डाउनलोड करून ती प्रत तुमच्याकडे ठेवा.
जेई परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण, प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय उमेदवारांना परीक्षेची मार्गदर्शक तत्त्वे वाचण्याचा आणि त्यानुसार परीक्षेला जाण्याचा सल्ला दिला जातो.देण्यात आला आहे.
(वाचा : Shloka Mehta Education: देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळख असणार्या अंबानी घराण्याची सून ‘श्लोका’चे शिक्षण तरी किती..?)