एअर इंडिया मध्ये विविध पदांची थेट मुलाखत माध्यमातून भरती! आजच करा अर्ज..

Air India Air Transport Services Limited Jobs 2023: विमान सेवेत काम करण्याची इच्छा असेल आणि नोकरीच्या शोधत आसाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) या कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन/हँडीवूमन या पदांच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि सविस्तर माहिती पाहूया…

‘एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२३’ मधील पदाचे नाव आणि पदसंख्या:
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक – ०५
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – ३९
हॅंडीमॅन/हँडीवूमन – २७९
एकूण पदे – ३२३

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे सविस्तर तपशील मूळ अधिसूचनेत दिले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली जोडली आहे.

(वाचा: Scholarship Schemes: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणाचा मार्ग सुलभ! शासनाकडून शिष्यवृत्ती जाहीर…)

नोकरी ठिकाण: कोचीन आणि कालिकत.

वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असून ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची तर एससी/एसटी वर्गाला ५ वर्षांची सवलत आहे.

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे.

मुलाखतीचा पत्ता: श्री जगन्नाथ सभागृह, वांगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वांगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२.

मुलाखतीची तारीख: कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदांसाठीच्या मुलाखती १७ ऑक्टोबर रोजी होतील तर हॅंडीमॅन/हँडीवूमन या पदांसाठीच्या मुलाखती १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

वेतन:
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक – २८ हजार २०० रुपये.
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – २३ हजार ६४०
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – २० हजार १३०
हॅंडीमॅन/हँडीवूमन – १७ हजार ८५०

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एअर इंडिया सर्विसेस लिमिटेडच्या अधिकृत संकेतशाळा भेट देण्याकरिता इथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: UPSC Recruitment: युपीएससी अंतर्गत कंबाईंड जीओ-सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२४ भरती… जाणून घ्या सर्व तपशील…)

Source link

aiasl recruitment 2023AIATSL bharti 2023aiatsl recruitment 2023air india air transport services limited jobsair india jobs 2023Career NewsGovernment jobJob News
Comments (0)
Add Comment