या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने थेट पालिकेच्या कार्यालयात दाखल करायचे आहेत. या भरतीमधील पद, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वेतन अर्ज करण्याचे ठिकाण आणि सविस्तर माहिती पाहूया…
‘जळगाव शहर महानगपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कनिष्ठ अभियंता – १७ (विभागवर)
रचना सहायक – ०४
आरेखक – ०२
अग्निशमन फायरमन – १५
विजतंत्री – ०६
वायरमन – १२
आरोग्य निरीक्षक – १०
टायपिस्ट/संगणक चालक – २०
एकूण रिक्त जागा – ८६
(वाचा: UPSC Recruitment: युपीएससी अंतर्गत कंबाईंड जीओ-सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२४ भरती… जाणून घ्या सर्व तपशील…)
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ अभियंता – संबधित विषयातील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.
रचना सहायक – वास्तुविशारद पदवी उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण.
आरेखक – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि शासनाचा आरेखक कोर्स केलेला असणे अनिवार्य.
अग्निशमन फायरमन – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि शासनाचा अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून संबंधित अभ्यासक्रम उत्तीर्ण असवा.
विजतंत्री – शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री ट्रेडमध्ये आयटीयाय अभ्यासक्रम उत्तीर्ण.
वायरमन – शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री ट्रेडमध्ये आयटीयाय अभ्यासक्रम उत्तीर्ण.
आरोग्य निरीक्षक – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स पूर्ण केलेला असावा तसेच बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी.
टायपिस्ट/संगणक चालक -मराठी टंकलेखनाचे ३० शब्द प्रतिमिनिट तर इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादेसह शासकीय प्रमाणपत्र मिळवलेले आसवे.
नोकरी ठिकाण: जळगाव
वयोमर्यादा: किमान १८ वर्षे तर कमाल ३८ वर्षे ( सर्व राखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे)
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत १० वा मजला, सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव – ४२५००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑक्टोबर २०२३ (सुट्टीचे दिवस वगळता सकाळी १० ते सायंकाळी ५.३०)
या भरती संदर्भातील अधिक माहीतसाठी जळगाव महानगरपालिकेच्या वेबसाईटल भेट द्यायची असल्यास येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया मध्ये विविध पदांची थेट मुलाखत माध्यमातून भरती! आजच करा अर्ज..)