‘एनएससीएल’च्या या भरती अंतर्गत ८९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये विविध ट्रेड मधील ट्रेनी, मॅनेजमेंट ट्रेनी आणि ज्युनिअर ऑफिसर या पदांचा समावेश आहे. तेव्हा या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता आजच करा. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि सविस्तर माहिती पाहूया…
राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ मधील रिक्त पदे आणि पदसंख्या:
ट्रेनी (अॅग्रिकल्चर) – ४० पदे
ट्रेनी (मार्केटिंग) – ६ पदे
ट्रेनी क्वालिटी कंट्रोल – ३ पदे
ट्रेनी अॅग्रि स्टोअर्स – १२ पदे
पात्रता : वरील सर्व ट्रेनी पदांसाठी साठी बी.एस्सी. (अॅग्रिकल्चर) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच कॉम्प्युटर (एम.एस. ऑफिस) चे ज्ञान असणे गरजेचे आहे.
.
ट्रेनी स्टेनोग्राफर – ५ पदे
पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि ऑफिस मॅनेजमेंटमधील स्टेनोग्राफीसह ३ वर्षांचा डिप्लोमा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि स्टेनोग्राफी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
.
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – १५ पदे
पात्रता : बी.एस्सी. (अॅग्री) आणि एम.बी.ए. (मार्केटिंग/ अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा एम.एस्सी. (अॅग्री) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) – १ पद
पात्रता – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील इंजिनीअरिंग) – १ पद
पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
ज्युनियर ऑफिसर (लिगल) – ४ पदे
पात्रता – कायदा विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि लीगल मॅटर्स हाताळण्याचा १ वर्षांचा अनुभव.
ज्युनियर ऑफिसर (व्हिजिलन्स) – २ पदे
पात्रता – पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा:
ज्युनिअर ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी १८ ते ३० वर्षांपर्यंत वयोमार्यादा आहे.
ट्रेनी पदांसाठी १८ ते २७ वर्षांपर्यंत वयोमार्यादा आहे.
पात्रतेच्या कमाल वयोमार्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची सूट तर मागासवर्गीयांना ५ वर्षांची सूट आहे.
(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया मध्ये विविध पदांची थेट मुलाखत माध्यमातून भरती! आजच करा अर्ज..)
वेतन/ स्टायपेंड :
ट्रेनी पदांसाठी दरमहा स्टायपेंड २३ हजार ६६४ रुपये
मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी स्टायपेंड दरमहा ५५ हजार ६८० रुपये.
ज्युनियर ऑफिसर पदांसाठी वेतन श्रेणी २२ हजार ते ७७ हजार.
भरतीसाठी अर्जाचे शुल्क:
खुला/ ओबीसी/ माझी सैनिक/ EWS यांना ५०० रुपये अर्ज शुल्क तर मागासवर्गीय/ PWD यांना अर्ज शुल्क माफ आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी ‘एनएससीएल’च्या या अधिकृत बेवसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023: जळगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती! वेळ न दवडता आजच करा अर्ज…)