डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कुलगुरू’ पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील…

BAMU Aurangabad Vice Chancellor Bharti 2023: शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाचे कुलगुरू हे अत्यंत मानाचे पद मानले जाते. या पदासाठी बरीच स्पर्धा देखील पहायाला मिळते. सध्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरू पदाच्या रिक्त जागेसाठी भरती सुरू आहे. नुकतीच याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरतीसाठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२३ आहे तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२३ आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याविषयी सविस्तर माहिती पाहूया…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद ‘कुलगुरू’ भरती विषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव आणि पदसंख्या:
कुलगुरू – ०१ जागा
एकूण पदसंख्या – ०१

शैक्षणिक पात्रता: विद्यापीठ अनुदान आयोगाने आखून दिलेल्या विद्यापीठ अधिनियमानुसार कुलगुरू पदासाठीआवश्यक ती शैक्षणिक पात्रता आणि अध्यापनासह संशोधन विषयातील अनुभव ग्राह्य धरला जाईल.

(वाचा: NSCL Recruitment 2023: राष्ट्रीय बियाणे महामंडळातील भरतीला मुदतवाढ! ‘या’ तारखे पर्यंत करू शकता अर्ज..)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती: ऑनलाईन आणि ऑफलाईन.

महात्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑक्टोबर २०२३
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – २७ ऑक्टोबर २०२३

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता: जानिबुल बशीर डॉ माहिती तंत्रज्ञान विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. श्रीनगर हजरतबल, श्रीनगर. पिन-१९०००६

ऑनलाइन अर्ज विद्यापीठाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करावा.

या भरतीसंदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांचे हे अधिकृत संकेतस्थळ पहावे.

(वाचा: Nashik Police Patil Bharti 2023: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! नाशिक जिल्ह्यात पोलिस पाटील पदासाठी महाभरती..)

Source link

bamu aurangabad bharti 2023bamu aurangabad newsBAMU Recruitment 2023BAMU vice chancellor Recruitment 2023Career Newsdr babasaheb ambedkar marathwada university jobsdr. babasaheb ambedkar marathwada universityGovernment jobJob News
Comments (0)
Add Comment