स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वतीने सायबर सिक्युरिटीवर मोफत कोर्सेस; अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणार प्रमाणपत्र

Stanford University USA Online Courses: नामांकित विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागतात. त्यात एखाद्या परदेशी विद्यापीठातील कोणता कोर्स कारचा असल्यास त्याची फी लाखोंमध्ये असते. मात्र पैसे भरणे प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य नसते. पण, जगामध्ये प्रसिद्ध व अव्वल स्थानावर असलेल्या विद्यापीठांमध्ये जर तुम्हाला मोफत कोर्सेस (Free Courses) करून नवनवीन अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळाली आणि येथे घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून जर तुम्हाला लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली तर, दुप्पट फायदाच नाही का..?

अगदी अशीच संधी जागतिक स्तरावर नाव लौकिक असलेल्या ‘स्टॅनफोर्ड विद्यापीठा’ने उपलब्ध करून दिलेली आहे. यूएसएमधील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्यावतीने ही संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्यावतीने असंख्य कोर्सेस ऑनलाइन लर्निंगसाठी सुरू करण्यात आली आहेत. या कोर्सेससाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागणार नाहीत.

(वाचा : Career In Marchant Navy: दहावी पास उमेदवारही भारतीय नौदलामध्ये करिअर घडवू शकतात; असा करता येईल अर्ज)

स्टॅनफोर्ड विद्यापीठात हे कोर्सेस अगदी फ्री :

जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठ होतकरु विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतपणे कोर्स पूर्ण करण्याची संधी देत आहे. या माध्यमातून तुम्हाला ‘सायबर सिक्युरिटी’ कोर्स अगदी मोफत करता येणार आहे. ही यूनिवर्सिटी सायबर सिक्युरिटीमध्ये आता अनेक ऑनलाईन प्रोग्राम ऑफर करत असून या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना असे माहिती तंत्रज्ञान तसेच संगणक प्रणालीच्या सुरक्षेच्या मूलभूत गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.

Cyber Attacks कसे टाळावे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे इत्यादी बद्दल शिकवले जाणार आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ऑफर केलेला हा ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य असून, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.

(वाचा : Talathi Bharti Exam 2023 Result: आता उत्सुकता तलाठी भरती परीक्षेच्या निकलाची; ‘या’ दिवशी पाहता येणार रिझल्ट)

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे कोर्सेस एवढ्या कालावधीचे :

या विद्यापीठाकडून सायबर सिक्युरिटीवर अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. दोन तासांपासून ते आठ-दहा तासांपर्यंतच्या अभ्यासक्रमांचा यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही तुमची वेळ आणि गरज यानुसार अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. या अभ्यासक्रमात विषय आणि प्रवेश याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या https://online.stanford.edu/ या वेबसाईटवर मिळेल.

सायबर सुरक्षा तज्ञांना इतका मिळतो पगार :

सायबर सुरक्षा तज्ञ म्हणून लाखोंच्या घरात पगार मिळतो. जर आपण भारताचाच विचार केला तर चार ते नऊ वर्षाचा अनुभव असलेल्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा वर्षाला सरासरी १२ लाख किंवा त्याहून अधिक पगार मिळतो. याचाच अर्थ महिन्याला एक लाख रुपये पर्यंत पगार या व्यक्तिला मिळतो. या क्षेत्रात जर तुम्हाला दहा ते वीस वर्षांचा कामाचा अनुभव असेल तर अशा सायबर सुरक्षा तज्ञांचा वार्षिक पगार हा २२ ते २५ लाख रुपये इतका असतो.

तब्बल ५८२ कोर्सेस उपलब्ध :

स्टॅनफोर्ड विद्यापीठाने विविध विषयांवरील तब्बल ५८२ ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. यातील अनेक कोर्सेस अगदी मोफत असून, काही कोर्सेससाठी शुल्क आकारले जाणार आहे.
(अधिक महितीसाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.)

(वाचा : India’s Top 10 NIT’s: जेईई परीक्षेनंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेशही गडबड होण्यापूर्वी, देशातील या सर्वोत्तम १० एनआयटीविषयी जाणून घ्या)

Source link

Cyber AttacksCyber Securitycyber security coursesForeign University Free CourseFree Courseshttps:online.stanford.eduStanford University USA Online Coursesusa
Comments (0)
Add Comment