फक्त ९९९९ रुपयांमध्ये ८जीबी पर्यंत रॅम; असे आहेत Oppo A18 चे फीचर्स

Oppo नं आपल्या ए-सीरीजचा विस्तार करत भारतीय बाजार Oppo A18 मोबाइल लाँच केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हा डिवाइस यूएईमध्ये सादर करण्यात आला होता. भारतात हा फोन त्याचा स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. फक्त ह्याची किंमत ९,९९९ रुपये करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन.

Oppo A18 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीनं Oppo A18 स्मार्टफोनच्या लाँचची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे आणि वेबसाइटवर देखील हा फोन लिस्ट झाला आहे. ओप्पोचा नवीन Oppo A18 मोबाइल सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध झाला आहे. ज्यात ४जीबी रॅमसह ६४GB स्टोरेज मिळते आणि ह्याची किंमत फक्त ९,९९९ रुपये आहे. फोन ग्लोइंग ब्लू आणि ग्लोइंग ब्लॅक अशा दोन रंगात आला आहे.

हे देखील वाचा: अनलिमिटेड ५जी डेटासह Jio चे ३ नवीन प्रीपेड प्लॅन लाँच; मोफत SonyLiv आणि Zee5 चं सब्सस्क्रिप्शनही

तसेच एसबीआय, वन कार्ड, आयडीएफसी, बँक ऑफ बडोदा सारख्या बँकांच्या कार्डवर १००० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळत आहे. तसेच लकी ड्रा ऑफर अंतगर्त ओप्पो ए१८ च्या खरेदीवर Oppo Enco Buds 2 देखील मोफत मिळतील.

Oppo A18 चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीनं फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस LCD डिस्प्ले दिला आहे. जो ८९.८०% स्क्रीन टू बॉडी रेशियो, ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ९०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, १६.७ बिलियन कलर आणि ७२० निट्झ पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

Oppo A18 मध्ये मीडियाटेक हेलिओ जी८५ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जो २.० गिगाहर्टझ क्लॉक स्पीडवर चालतो. तर ग्राफिक्ससाठी माली जी५२ एमसी२ जीपीयूची सोबत मिळते. जोडीला ४जीबी रॅम व ६४जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तर ४जीबी एक्सटेंडेड रॅमच्या मदतीनं ८जीबी पर्यंत रॅमची ताकद मिळवता येते.

Oppo A18 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला स्वदेशी Lava O1; किंमत फक्त ६९९९ रुपये

फोनमध्ये पावर बॅकअपसाठी ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. अन्य फीचर्स पाहता डिवाइसमध्ये युजर्सना साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ ५.३, वाय-फाय, ३.५mm हेडफोन जॅक, यूएसबी टाइप पोर्ट सारखे फीचर्स मिळतात. हा नवीन ओप्पो फोन लेटेस्ट अँड्रॉइड १३ वर चालतो.

Source link

oppooppo a18oppo a18 launchoppo a18 priceoppo a18 price in indiaओप्पोओप्पो ए१८
Comments (0)
Add Comment