इंजिनियर्ससाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण’ मध्ये महाभरती! आजच करा अर्ज..

राज्य सरकारच्या अंतर्गत येणार्‍या महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ‘महापारेषण’ (Mahatransco)कडून ५९८ पदांसाठी ही भरती घेण्यात येणार असून यामध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यापदांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून २४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३ मधील पदे, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती पाहूया…

‘महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – २६ जागा
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – १३७ जागा
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – ३९ जागा
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) – ३९० जागा
सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) – ०६ जागा
एकूण रिक्त जागा ५९८

शैक्षणिक पात्रता:
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण आणि ९ वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून २ वर्षे अनुभव.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण आणि ७ वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून २ वर्षे अनुभव.
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी आणि ३ वर्षे अनुभव.
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.

(वाचा: BAMU Recruitment 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कुलगुरू’ पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील..)

वयोमर्यादा:
कार्यकारी अभिनयंता – कमाल वयोमार्यादा ४० वर्षे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – कमाल वयोमार्यादा ४० वर्षे
उप कार्यकारी अभियंता – कमाल वयोमार्यादा ३८ वर्षे
सहाय्यक अभियंता – कमाल वयोमार्यादा ३८ वर्षे
(सर्व पदांमध्ये राखीव प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत ५ वर्षे सवलत)

अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गास ७०० रुपये टीआर राखीव प्रवर्गास ३५० रुपये अर्ज शुल्क आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ ऑक्टोबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता ‘महापारेषण’च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या संबधित पदावर क्लिक करा आणि त्या पदाची सविस्तर माहिती जाणून घ्या. .
undefinedकार्यकारी अभियंता

undefinedअतिरिक्त कार्यकारी अभियंता

उप कार्यकारी अभियंता

सहाय्यक अभियंता

(वाचा: NSCL Recruitment 2023: राष्ट्रीय बियाणे महामंडळातील भरतीला मुदतवाढ! ‘या’ तारखे पर्यंत करू शकता अर्ज..)

Source link

Career NewsGovernment jobJob NewsMahapareshan bharti 2023mahapareshan recruitmentMahapareshan Recruitment 2023maharashtra state electricity transmission companyMahatransco bharati 2023mahatransco bharti 2023mahatransco recruitment 2023
Comments (0)
Add Comment