(फोटो सौजन्य : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन Instagram)
प्रथमेश लघाटे हा आजच्या तरुण पिढीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’पासून प्रेक्षक त्याला बघत आले आहेत. त्याच्या गायनाचं नेहमीच भरभरून कौतुकही झाले आहे. गायनाबरोबरच तो शिक्षणातही पुढे आहे.
(वाचा : Shloka Mehta Education: देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळख असणार्या अंबानी घराण्याची सून ‘श्लोका’चे शिक्षण तरी किती..?)
संगमेश्वरच्या माखजन इंग्लिश स्कूलमधून प्रथमेशचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्याने मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्य आणि इतिहास या विषयांमध्ये पदवी मिळवली आहे. यासोबतच प्रथमेशने पुण्याच्या भारती विद्यापीठातून MA in Music केले आहे.
तर दुसरीकडे, सा रे ग म प L’IL Champs मधली लिटिल मॉनिटर अशा ओळख असणार्याने मुग्धाने अलिबागच्या को. ए. सो शाळेतून आपले शाळेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून बीएससी इन स्टॅटिस्टीक्स विषयातील ती पदवीधर आहे. याव्यतिरिक्त मुग्धा वैशंपायन हिने मुंबई विद्यापीठातून एमए इन म्युझिक ही पदवी मिळवली. काही महिन्यापूर्वी मुग्धाच्या या मास्टर्स डिग्रीचा निकाल लागला आणि त्यात तिला सुवर्णपदकही मिळाले आहे.
(वाचा : RaghNeeti Education: Scholars असणाऱ्या परिणिती-राघवची लग्नगाठ, दोघेही होते हुशार विद्यार्थी जाणून घ्या या दोघांचे शिक्षण)