महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई अंतर्गत भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील…

MERC Mumbai Bharti 2023: राज्याच्या वीजसेवेत काम करण्याची संधी चालून आली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांच्या अंतर्गत भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील काही प्रमुख केंद्रांवर काम करण्यासाठी ही भरती होणार आहे. या भरतीमध्ये चेयरपर्सन आणि इंडेपेण्टेंड मेंबर या पदांच्या १६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २६ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती पाहूया…

‘महाराष्ट्र वीज नियामक आयोग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
चेयरपर्सन – १४ जागा
इंडेपेण्टेंड मेंबर- ०२ जागा
एकूण पदसंख्या – १६

शैक्षणिक पात्रता: दोन्ही पदांची पात्रता आणि अनुभव पद निहाय वेगळे असून त्याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली जोडली आहे.

(वाचा: Mahapareshan Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण’ मध्ये महाभरती! आजच करा अर्ज..)

नोकरी ठिकाण: मुंबई सह महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र.

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता: सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, १३ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, सेंटर नंबर-१, कफ परेड, मुंबई- ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑक्टोबर २०२३

वेतनश्रेणी:
चेयरपर्सन – ४० हजार ते ५० हजार
इंडेपेण्टेंड मेंबर- ३५ हजार ते ४० हजार
( वरील पदांचे केंद्रनिहाय वेतन विभागले असून त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत)

अर्ज कसा करावा: या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे २६ ऑक्टोबर आधी वरल दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: BAMU Recruitment 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कुलगुरू’ पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील..)

Source link

Career NewsGovernment jobJob NewsMaharashtra Electricity Regulatory CommissionMaharashtra Electricity Regulatory Commission jobsMERC jobsMERC Mumbai Bharti 2023MERC Mumbai Recruitment 2023MERC recruitment 2023
Comments (0)
Add Comment