पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती! आजच करा अर्ज…

PCMC Bharti 2023: नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू आहे. या भरती प्रक्रिये द्वारे व्यवस्थापकीय संचालक, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर या पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती करिता अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून १६ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठीची पात्रता, वयोमार्यादा, अर्ज प्रक्रिया यासह सविस्तर तपशील जाणून घेऊया…

‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
व्यवस्थापकीय संचालक – ०१
प्रशासकीय अधिकारी – ०१
कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर – ०१
एकूण पदसंख्या – ०३

शैक्षणिक पात्रता:
व्यवस्थापकीय संचालक – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पुनर्वसन या विषयात पीएचडी असणे आवश्यक आहे. यासोबत व्यवसाय व्यवस्थापन आणि फायनान्स विषयातून एमबीए केले असल्यास प्राधान्य दिले जाईल.

प्रशासकीय अधिकारी – पुनर्वसन विषयात एमबीए किंवा एमएसडब्ल्यू पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर- वाणिज्य शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच एमएस-सीआयटी आणि टॅली येणे गरजेचे आहे.

(वाचा: Mahapareshan Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण’ मध्ये महाभरती! आजच करा अर्ज..)

वयोमर्यादा:
व्यवस्थापकीय संचालक – कमाल वयोमार्यादा ५० वर्षे.
प्रशासकीय अधिकारी – कमाल वयोमार्यादा ३५ वर्षे.
कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर – कमाल वयोमार्यादा २५ वर्षे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन ई-मेल द्वारे.

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे.

ई-मेल पत्ता: divyangbhavanpcmc@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑक्टोबर २०२३ (दुपारी ३ वाजेपर्यंत)

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा: या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन ई-मेल द्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे १६ ऑक्टोबरच्या आधी सादर करणे गरजेचे आहे. उशिरा प्राप्त झालेले किंवा अपूर्ण राहिलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: MERC Mumbai Bharti 2023: महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई अंतर्गत भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील…)

Source link

Career NewsGovernment jobJob NewsPCMC Bharti 2023PCMC recruitment 2023Pimpri Chinchwad MahanagarpalikaPimpri Chinchwad Mahapalika jobsPimpri Chinchwad Municipal Corporation bharti 2023Pimpri Chinchwad Municipal Corporation recruitment
Comments (0)
Add Comment