नारायण राणेंच्‍या अटकेनंतर शिवसैनिकांचा जल्‍लोष; जळगावात फोडण्यात आले फटाके

जळगाव:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्‍यभरात शिवसैनिकाकांकडून घोषणा देत आंदोलन करत अटकेची मागणी करण्यात येत होती.
मात्र दुपारीच राणे यांना पोलिसांनी अटक केल्‍यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्‍लोष केला.राज्‍यभरात शिवसैनिकांकडून सकाळपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणेंना पोलीसांनी अटक केली आहे. रत्नागिरीच्या संगमेश्वर येथील गोळवलीकर गावात त्यांना अटक करण्यात आली. रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणेंचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर राणेंना संगमेश्वर याठिकाणी अटक करण्यात आली.राज्यभरात शिवसैनिकांमध्‍ये संतापाची लाट उसळली होती. राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबई, नाशिक,पुणे, औरंगाबाद,धुळे या शहरात शिवसेना विरुद्ध भाजपा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र दिवसभराच्या संघर्षानंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली.यानंतर शिवसैनिकांनी जल्‍लोष केला.जळगावात महापालिकेसमोर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्‍लोष करण्यात आला.

Comments (0)
Add Comment