OnePlus Pad GO चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लसनं पॅड गो टॅबलेटमध्ये ११.३५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिजोल्यूशन २.४K, रिफ्रेश रेट १४४Hz आणि अॅस्पेक्ट रेश्यो ७.५ आहे. याची स्क्रीन Dolby Vision आणि HDR10+ ला सपोर्ट करते. तसेच टॅबलेटमध्ये शानदार साउंडसाठी क्वॉड स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत, जे Dolby Atmos ला सपोर्ट करतात.
हे देखील वाचा: Cricket World Cup साठी Airtel चे स्पेशल प्लॅन लाँच, मिळेल अनलिमिटेड डेटा
तसेच, हा टॅब Android 13 आधारित OxygenOS 13.1 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. वनप्लस पॅड गो टॅबलेटमध्ये Helio G99 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह Mali-G57 MP2 GPU देण्यात आला आहे. ह्यात ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.३, जीपीएस, वाय-फाय ६, यूएसबी टाईप-सी पोर्ट, LTE आणि ५जी कनेक्टिव्हिटी मिळते.
पॅड गो टॅबलेटच्या मागे ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. जो ४के३० एफपीएस फॉर्मेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. तर व्हिडीओ कॉलिंगसाठी टॅबच्या फ्रंटला देखील ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. टॅबलेटला पावर देण्यासाठी कंपनीनं ८,०००एमएएचच्या बॅटरीचा वापर केला आहे जी ३३वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीनं चटकन चार्ज करता येते.
हे देखील वाचा: यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; जाणून घ्या Amazon ग्रेट इंडियन सेलमधील ऑफर
OnePlus Pad Go ची किंमत
वनप्लस पॅड गो च्या ८जीबी रॅम +१२८जीबी स्टोरेज वाय-फाय व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आणि एलटीई मॉडेलची किंमत २१,९९९ रुपये आहे. तसेच, इसके ८जीबी रॅम +२५६जीबी स्टोरेज एलटीई व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर दुपारी १२ वाजल्यापासून हा टॅब ऑफिशियल वेबसाइट आणि Amazon India वरून प्री-बुक करता येईल.