महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत कंत्राटी विधी अधिकारी पदाची भरती, जाणून घ्या सर्व तपशील..

तुम्ही विधी क्षेत्रात शिक्षण केले आहे आणि उत्तम नोकरीची वाट पाहत असाल तर महाराष्ट्र महामार्ग पोलीस विभागात एक नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र महामार्ग पोलीस यांच्या अंतर्गत ‘गट अ’च्या कंत्राटी विधी अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १२ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठीची पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करावा याचे सर्व तपशील जाणून घेऊया…

‘महाराष्ट्र महामार्ग पोलीस विधी अधिकारी भरती २०२३’ मधील पदाचे नाव पदसंख्या:
कंत्राटी विधी अधिकारी, गट-अ – ०१ जागा
एकूण पदसंख्या – ०१

शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्रात विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा आणि तो सनद धारक असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई

(वाचा: MERC Mumbai Bharti 2023: महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई अंतर्गत भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील…)

अर्ज शुल्क: २०० रुपये

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वेतन: एकत्रित अनुज्ञेय मासिक वेतन दुरध्वनी आणि प्रवास खर्च ३० हजार + ५ हजार मिळून एकूण रक्कम ३५ हजार इतके असेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई मोतीमहल, ६ वा मजला, १९५. जे. टाटा मार्ग, सी.सी.आय. क्लब जवळ, सम्राट रेस्टॉरंट समोर, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ ऑक्टोबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामार्ग पोलिस यांच्याअधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र महामार्ग पोलिस विधी अधिकारी भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा: उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १२ ऑक्टोबर आधी जमा करणे गरजेचे आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

(वाचा: PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती! आजच करा अर्ज…)

Source link

Career NewsGovernment jobhighway police maharashtraJob NewsMaharashtra Highway Police Bharti 2023Maharashtra Highway Police recruitment 2023police bhartiPolice Bharti 2023
Comments (0)
Add Comment