Boult Sterling स्मार्टवॉचचे फीचर्स
ह्यात १.५२ इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. जो ३६०x३६० पिक्सल रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ७०० निट्झ पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ह्यात क्रिस्टल क्लियर व्हिज्युअल्स मिळतील. ह्यात ६० हर्ट्झचा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील देण्यात आलं आहे. ह्यात ब्लूटूथ ५.३ चा सपोर्ट देखील आहे. हा व्हॉइस असिस्टंट, आयपी६७ रेटिंग आणि १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडसह येतो.
हे देखील वाचा: यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; जाणून घ्या Amazon ग्रेट इंडियन सेलमधील ऑफर
ह्यात अनेक हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत ज्यात SpO2 ब्लड ऑक्सीजन मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर आणि हार्ट रेट मॉनिटरचा समावेश करण्यात आला आहे. महिलांसाठी मॅन्युस्ट्रल सायकल ट्रॅकर देखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्लीप ट्रॅकिंग आणि वॉटर ड्रिकिंग रिमाइंडर सारखे फीचर्स देखील मिळतात.
हे देखील वाचा: OnePlus चा सर्वात स्वस्त टॅबलेट भारतात लाँच; कमी किंमतीत मोठा डिस्प्ले आणि ८०००एमएएचची बॅटरी
Sterling स्मार्टवॉचमध्ये १५० पेक्षा जास्त क्लाउड वॉच फेस देण्यात आले आहेत जे तुम्ही तुमच्या युनिक स्टाइल आणि मूडनुसार बदलले जाऊ शकतात. ह्यात AI व्हॉइस असिस्टंटचं फीचर देखील आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही रिमायंडर लावू शकता आणि स्मार्ट डिवाइस कंट्रोल करू शकता. ह्यात तुम्हाला रियल-टाइम वेदर अपडेट दिले जातील. त्याचबरोबर हे स्मार्टवॉच Find My Phone फीचरसह आलं आहे. ह्यात ४ मिनी गेम्स देखील उपलब्ध आहेत.