राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे अंतर्गत ५० जागांसाठी विशेष भरती!

तुम्ही ‘डीटीपी’चा कोर्स केला असेल आणि उत्तम नोकरीची संधी शोधत असाल केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या (NCERT) नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेमध्ये भरती सुरू आहे. ‘एनसीईआरटी’ अंतर्गत ‘डीटीपी ऑपरेटर’ पदाच्या एकूण ५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येणार आहेत. या मुलाखती दिल्ली येथे ०९ ऑक्टोबर रोजी होणार आहेत.नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या पदासाठीची पात्रता, वेतन आणि सविस्तर माहिती पाहूया…

‘एनसीईआरटी भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
डीटीपी ऑपरेटर – ५० जागा
एकूण पदसंख्या – ५०

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून डीटीपी या विषयातील एका वर्षाचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे.

वेतन: २३ हजार रुपये

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली

(वाचा: Mahapareshan Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण’ मध्ये महाभरती! आजच करा अर्ज..)

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे

मुलाखतीचा पत्ता: प्रकाशन विभाग, आंबेडकर ब्लॉक,एनसीईआरटी, नवी दिल्ली

मुलाखतीची तारीख: ०९ ऑक्टोबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘एनसीईआरटी’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

‘एनसीईआरटी’ च्या या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया: या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. पात्र उमेदवारांनी संबंधित तारखेला म्हणजे ९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे. येताना अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे अर्ज व आवश्यक कागदपत्रा सोबत आणावीत. प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवासी किंवा निवासी भत्ता दिला जाणार नाही. उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

(वाचा: MERC Mumbai Bharti 2023: महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई अंतर्गत भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील…)

Source link

Career NewsDTP operator jobsGovernment jobJob NewsNCERT bharti 2023ncert jobsncert jobs 2023ncert NEWSNCERT Recruitment 2023ncert vacancy
Comments (0)
Add Comment