हायलाइट्स:
- आणखी एका जिल्ह्याने चिंता वाढवली
- डेल्टा प्लसच्या रुग्ण आढळल्याने खळबळ
- आरोग्य विभागाने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन
गडचिरोली : एकेकाळी ग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात करोनाने शिरकाव केल्यावर आता करोनाच्या नवीन डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरमहा काही नमुने तपासणीसाठी पुणे येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. यातील काल ६ नमुने करोनाच्या नवीन डेल्टा प्लसचे आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
यामध्ये चामोर्शी तालुक्यात ३, गडचिरोली १ व अहेरी तालुक्यात २ रूग्ण आढळून आले आहेत. याबाबत आरोग्य विभागाने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. करोना बाबत दिलेल्या विविध आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी नागरिकांनी करावी असे आवाहनही विभागाने केले आहे.
आज ८ करोना बाधित तर २ करोनामुक्त
आज गडचिरोली जिल्हयात ५६९ करोना तपासण्यांपैकी ०८ नवीन करोना बाधित आढळून आले. तसेच आज ०२ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित ३०६८९ पैकी करोनामुक्त झालेली संख्या २९९१५ व पोहचली. तसेच सद्या २८ सक्रिय करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण ७४६ मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्ह्यातील करोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.०९ टक्के तर मृत्यू दर २.४३ टक्के झाला.
नवीन ०८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ०३, अहेरी तालुक्यातील ००, आरमोरी ००, भामरागड तालुक्यातील ००, चामोर्शी तालुक्यातील ०२, धानोरा तालुक्यातील ००, एटापल्ली तालुक्यातील ००, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ०२, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ०१, कोरची तालुक्यातील ००, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ००, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ०० जणांचा समावेश आहे. तर आज करोनामुक्त झालेल्या ०२ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ००, अहेरी ००, आरमोरी ००, भामरागड ००, चामोर्शी ०२, धानोरा ००, एटापल्ली ००, मुलचेरा ००, सिरोंचा ००, कोरची ००, कुरखेडा ०० तसेच वडसा येथील ०० जणांचा समावेश आहे.