आयफोन १५ नाही आवडला? मग iPhone 16 साठी व्हा तयार; जबरदस्त फीचर्स झाले लीक

iPhone 15 सीरीज होऊन अजून महिनाही झाला नाही. इतक्यात आता iPhone 16 ची चर्चा सुरु झाली आहे. आयफोन 16 बाबत ऑनलाइन लीक्स येऊ लागले आहेत. आयफोन 16 च्या लाँच डेटची निश्चित माहिती मिळाली नाही परंतु आता लीक्समधून ह्या आगामी सीरीजच्या फीचर्सची महत्वाची माहिती समोर आली आहे. आगामी आयफोन्सच्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला सर्वात मोठा बदल दिसू शकते. लीकनुसार कंपनी आयफोन 16 च्या बेस व्हेरिएंटमध्ये देखील १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो. आतापर्यंत युजर्सना आयफोन्समध्ये ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळत होता आणि ज्यामुळे ग्राहक खुश नव्हते.

फोनच्या प्रो व्हेरिएंट म्हणजे iPhone 16 Pro मध्ये ६.३ इंचाचा आणि iPhone 16 Pro Max मध्ये ६.९ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच, आयफोन 16 आणि 16 प्लसच्या डिस्प्लेमध्ये बदल खूप कमी असतील. ह्यात अनुक्रमे तुम्हाला ६.१ आणि ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. आयफोन 16 ची आणखी एक खासियत म्हणझे ह्यात तुम्हाला सॉलिड स्टेट बटन्स मिळू शकतात. अ‍ॅपल अनॅलिस्ट मिंग-शी कुओनुसार अ‍ॅपल आपल्या आयफोन 16 प्रो मॉडेलमध्ये सॉलिड स्टेट बटन देऊ शकते.

हे देखील वाचा: Amazon Sale: फक्त प्राइम युजर्सना मिळेल ह्या तीन स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर्स

लीक रिपोर्टनुसार कंपनी आयफोन 16 आणि 16 प्रो मॅक्स मध्ये टेट्रा-प्रिज्म टेलिफोटो कॅमेऱ्याचा वापर केला जाऊ शकतो. ही टेक्नॉलॉजी ह्या फोनमध्ये ३एक्स ते ५एक्स पर्यंतचा ऑप्टिकल झूम ऑफर करेल. ही टेक्नॉलॉजी डीटेल्ड फोटोग्राफी एक्सपीरियंस देईल. आणखी एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की कंपनी आयफोन 16 प्रो सीरीजमध्ये ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देणार आहे. जो युजर्सना शानदार लो-लाइट परफॉर्मन्स देईल. पुढील वर्षी लाँच होणाऱ्या ह्या फोनमध्ये तुम्हाला कंपनीचा नवा ए१८ प्रो चिपसेट मिळू शकतो.

हे देखील वाचा: Flipkart Big Billion Days Sale: १५ हजारांच्या आत येणारे हे आहेत बेस्ट स्मार्टफोन

Source link

apple iphone 16iPhoneiphone 16iphone 16 cameraiphone 16 displayiphone 16 priceiphone 16 specifications
Comments (0)
Add Comment