हायलाइट्स:
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींत वाढ
- गुन्हे दाखल केल्यानंतर आता शिवसेनेची नवी खेळी
- राणेंचे केंद्रीय मंत्रिपद घालवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न
रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणारे व कानाखाली वाजवण्याची भाषा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवसेनेनं चांगलीच कोंडी केली आहे. राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर व त्यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आता शिवसेनेनं त्यांना मंत्रिपदावरून हाकललं जावं, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (Vinayak Raut Writes to PM Narendra Modi against Narayan Rane)
वाचा: नारायण राणेंना कोर्टाकडून तातडीचा दिलासा नाही! आता काय होणार?
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसं पत्रच लिहिलं आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा नारायण राणे यांनी केली आहे. त्यांची ही भाषा निषेधार्ह आहे. त्या भाषेचं कुणीही समर्थन करू शकत नाही. ज्या नेत्याला आपल्या मर्यादा ओळखता येत नाहीत. आपल्या पदाची प्रतिष्ठा राखता येत नाही, त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. राणे यांनी वापरलेली भाषा हा केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांचाही अपमान आहे,’ असं राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. ‘ही असली भाषा वापरून एक केंद्रीय मंत्री समाजाला कोणता संदेश देऊ पाहत आहेत? आपण तात्काळ राणेंचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
वाचा: ‘मी नॉर्मल माणूस नाही’ म्हणणाऱ्या राणेंना पोलीस आयुक्तांचं सडेतोड उत्तर
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पत्राची दखल घेतल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधण्याची सूचना केली आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी माध्यमांना दिली. काही वेळातच पत्राला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले.
मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वक्तव्य नारायण राणेंना भोवलं, रत्नागिरी पोलिसांनी केली अटक
वाचा: नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया