मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रभारी संचालकपदी डॉ. संतोष राठोड यांची नियुक्ती

Mumbai University Idol: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या प्रभारी संचालकपदी आयडॉलचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. संतोष राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(फोटो सौजन्य : मुंबई विद्यापीठ)

आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांची सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याने आयडॉलचे संचालकपद रिक्त झाले होते. रिक्त झालेल्या पदावर विद्यापीठाने प्रभारी संचालक म्हणून डॉ. संतोष राठोड यांची नियुक्ती करण्यात आली.

(वाचा : Mumbai University Exams: तयारीला लागा… ; मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षेच्या तारखा जाहीर)

डॉ. संतोष राठोड हे आयडॉलमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असून २००६ पासून ते आयडॉल मध्ये कार्यरत आहेत. इंग्रजी, मराठी आणि गोरबोली भाषेचे उत्कृष्ट कवी व नाटककार असून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या प्रभारी संचालकपदी निवड करण्यात आलेल्या डॉ. संतोष राठोड यांनी इंग्रजी व मराठी भाषेत काही नाटके लिहिली आहेत. बंजारा समाजातील गौर बंजारा या भाषेतील अनेक साहित्य त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवादित केले आहे. ते पीएचडी/एम फिल चे मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते लेखक आहेत. ते अनेक विद्यापीठाच्या व महाविद्यालयाच्या अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. ते संचालक म्हणून पुढील नियुक्ती होईपर्यंत ते या पदाचा कार्यभार पाहतील.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात; दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया)

Source link

Dr. Santosh RathodIdolidol newsmu newsmumbai universitymumbai university idol
Comments (0)
Add Comment