Cricket World Cup 2023: क्रिकेट वर्ल्ड कपची एक मॅच बघण्यासाठी किती जीबी डेटा लागतो, चला जाणून घेऊया

Cricket World Cup 2023 ची सुरुवात झाली आहे आणि ह्यात मोठ्या स्पर्धेची भारतातील क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. भारतीयांचं क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे आणि ह्या वर्ल्ड कप दरम्यान क्रिकेट मॅच बघणाऱ्यांची संख्या नवीन विक्रम करेल अशी अपेक्षा आहे. क्रिकेटचे सामने ऑनलाइन प्रक्षेपित केल्यामुळे कुठूनही बघता येतात. परंतु त्यासाठी तुमच्याकडे डेटा पॅक असणं आवश्यक आहे. परंतु एक सामना स्ट्रीम करण्यासाठी नेमका किती डेटा लागतो हे माहिती आहे का? चला पाहूया.

अचूक आकडा सांगण्यापूर्वी एक बाब लक्षात घ्या की ह्या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं नाही. तुम्हाला माहिती असेल की Disney+ Hotstar वर २०२३ चा क्रिकेट वर्ल्ड कप स्ट्रीम केला जात आहे आणि ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सपोर्ट पेजनुसार कंटेंट ऑनलाइन स्ट्रीम करण्यासाठी वेगवेगळ्या रिजोल्यूशननुसार तुमच्याकडे ठराविक बँडविथ असणं आवश्यक आहे.

Disney+ Hotstar नं रेकमंड केलेलं बँडविथ

एचडी कंटेंट: ५Mbps

जर तुम्ही क्रिकेट वर्ल्ड कपचे समाने स्टॅण्डर्ड हाय डेफिनेशन (HD) मध्ये पाहत असाल तर तुमचा डाउनलोड स्पीड कमीत कमी ५ Mbps असावा. त्यामुळे सामने स्मूद आणि क्लियर बघता येतील.

फुल एचडी कंटेंट: ८Mbps

ज्यांना फुल एचडीमध्ये जर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहायचं असेल तर ८ Mbps चा डाउनलोड स्पीड असावा. ह्या स्पीडवर लाइव्ह अ‍ॅक्शन कोणत्याही बफरविना स्ट्रीम करता येते.

४के कंटेंट: २५Mbps

जर तुमच्याकडे ४के क्षमता असलेलं डिवाइस असेल तर तुमच्याकडे २५ Mbps डाउनलोड स्पीड देणारं इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा: आयफोन १५ नाही आवडला? मग iPhone 16 साठी व्हा तयार; जबरदस्त फीचर्स झाले लीक

वरील माहितीवरून आपल्याला तीन तासांचा क्रिकेटचा सामना ऑनलाइन स्ट्रीम करण्यासाठी किती डेटा लागेल ते मोजू शकतो.

संपूर्ण क्रिकेट मॅच स्ट्रीम करण्यासाठी लागणारा डेटा जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील फॉर्म्युला वापरावा लागेल:

आवश्यक डेटा (जीबीमध्ये) = (बिट्रेट इन एमबीपीएस) x (सामन्याचा कालावधी तासांमध्ये) / ८

उदाहरणार्थ, जर तुम्ही ३ तासांची वर्ल्ड कप क्रिकेटची मॅच एचडी क्वॉलिटी (5 Mbps) मध्ये स्ट्रीम केली तर:

आवश्यक डेटा = (५ Mbps) x (३ तास) / ८ = १.८७५ जीबी

म्हणजे तीन तास एचडी स्ट्रीमसाठी तुमचा १.८७५ डेटा खर्च होईल.

लाइव्ह स्ट्रीम (८ Mbps) वर ३ तासांची मॅच बघण्यासाठी तुमचा सुमारे ३जीबी डेटा खर्च होईल आणि ४के स्ट्रीम (२५ Mbps) साठी सुमारे ९.३७५ डेटा आवश्यक आहे.

नोट: लक्षात असू द्या की वरील कॅल्क्युलेशन परिपूर्ण नाही. वास्तवात डेटाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो.

अ‍ॅक्ट फायबरनेटनुसार, क्रिकेट मॅच ऑनलाइन फुल एचडीमध्ये स्ट्रीम करण्यासाठी दरतासाला १.३ जीबी डेटा वापरला जातो, तर ७२०पी कंटेंट स्ट्रीम करण्यासाठी तासाला ६३९एमबी आणि लो रिजोल्यूशनवर स्ट्रीम करण्यासाठी दरतासाला २४९एमबी डेटा लागतो.

हे देखील वाचा: Flipkart Big Billion Days Sale: १५ हजारांच्या आत येणारे हे आहेत बेस्ट स्मार्टफोन

नेमका किती इंटरनेट डेटा लागतो

वरील कॅल्क्युलेशननुसार दर्शकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर ३ तास स्ट्रीमिंग करण्यासाठी सुमारे ४जीबी डेटा आवश्यक आहे. ह्यावरून तुम्हाला किती तास कंटेंट स्ट्रीम करायचा आहे ते पाहा आणि अंदाज लावा की एकदिवसीय क्रिकेट सामना ऑनलाइन स्ट्रीम करण्यासाठी किती डेटा लागेल.

Source link

cricket world cup 2023Hotstarhow much data you need to stream matches onlinehow much data you need to stream odihow much data you need to stream on hotstar
Comments (0)
Add Comment