सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रमाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि एनएमसी (NMC) यांनी मिळून सीबीएसईसह राज्य मंडळांशी दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम अंतिम करण्यात आला आहे. एनएमसीने हा अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
NEET (UG) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी परीक्षेच्या हंगल्या तयारीसाठी NEET (UG) 2024 च्या अद्ययावत अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी NTA ने CBSE, CISCE आणि इतर राज्यांच्या राज्य मंडळांशी चर्चा केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हा अभ्यासक्रम सर्व शिक्षण मंडळांना पाठविण्यात आला असून त्यानंतर समान अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)
सदर अभ्यासक्रम तयार करण्यामागचा उद्देश सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. खरे पाहता, NEET UG अभ्यासक्रमाबाबत, अनेक राज्यांतील बोर्ड विद्यार्थ्यांनी त्यांना अभ्यासक्रमातील काही भाग शिकवला जात नसल्याची तक्रार केली होती. आता एनएमसी आणि एनटीएने मिळून प्रयत्न केले आहेत की ते सीबीएसई शाळांचे विद्यार्थी असोत किंवा कोणत्याही राज्य मंडळाचे विद्यार्थी, सर्वांसाठी समान अभ्यासक्रम असावा आणि कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये. NEET (UG) 2024 ची प्रवेश परीक्षा ५ मे २०२४ रोजी होणार आहे.
मंत्रालयाचाही पुढाकार आहे :
केंद्रीय शिक्षण मंत्रालयालाही देशातील सर्व मंडळांना एकाच व्यासपीठावर आणायचे आहे. CBSE आणि CISCE ही दोन नियमित केंद्रीय शाळा मंडळे आहेत. याशिवाय, जर आपण वेगवेगळ्या राज्यांवर नजर टाकली तर सध्या ६० शाळा मंडळे आहेत. प्रत्येक बोर्डाचा शैक्षणिक दर्जा, अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या तारखांसाठी वेगळा फॉर्म्युला असतो. सर्व शालेय मंडळांचे निकाल आणि मूल्यमापन पद्धतीचे विश्लेषण केल्यानंतर असे दिसून आले आहे की, मंडळांचे मूल्यमापन, परीक्षा पद्धती आणि शैक्षणिक स्तर यामध्ये एकसमानता आणण्याची गरज आहे. देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय परीक्षा NEET आहे. अभियांत्रिकीसाठी ती JEE Main आहे. मात्र विविध शाळा मंडळांमधील विज्ञान अभ्यासक्रमात फारसा फरक नसावा. ही दरी कमी व्हायला हवी आणि त्या दिशेने उपक्रम सुरू केले गरजेचे असल्यामुळे हे पहिले पाऊल उचलले गेले आहे. २०२३ मध्ये २०.८७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि विक्रमी ९७ टक्के म्हणजेच २० लाख ३८ हजार ५९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
(वाचा : NMC Recognition From WFME: डब्ल्यूएफएमई कडून एनएमसीला १० वर्षांसाठी मान्यता, MBBS च्या विद्यार्थ्यांना होणार हा फायदा