व्हॉट्सअॅप सिक्रेट कोड फिचर म्हणजे काय?
आतापर्यंत लॉक केलेलं व्हॉट्सअॅप चॅट मुख्य चॅटमध्ये दिसत नव्हते. चॅट लिस्टच्या टॉपला जाऊन खालच्या बाजूला स्वाइप केल्यावर लॉक्ड चॅट ऑप्शन दिसतो. त्यानंतर लॉक्ड चॅट ओपन करण्यासाठी बायोमेट्रिकचा वापर करावा लागतो. तसेच प्रायव्हसीमुळे लॉक केलेलं चॅट व्हॉट्सअॅपच्या सर्चमध्ये दिसत नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे लॉक केलेले अनेक चॅट असतील तर स्पेसिफिक चॅट शोधणं कठीण होऊन बसतं. व्हॉट्सअॅपचं नवीन सिक्रेट कोड फीचर त्यासाठीच आहे.
हे देखील वाचा: १३ हजारांच्या आत आला Samsung चा नवा टॅबलेट; Galaxy Tab A9 सीरीजचे दोन मॉडेल भारतात लाँच
लेटेस्ट अपडेटनंतर, युजर्सना व्हॉट्सअॅपवर कोणतंही चॅट लॉक करताना एक सिक्रेट कोड सेट करण्याचा ऑप्शन मिळेल. हा सिक्रेट कोड व्हॉट्सअॅपच्या सर्च बारमध्ये टाकता येईल, त्यामुळे लॉक केलेल्या चॅटचं नाव समोर येईल. परंतु अजूनही ते चॅट अनलॉक करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक असेल.
युजर सिक्रेट कोड म्हणून एक शब्द सेट करू शकतात किंवा इमोजी देखील वापरू शकतात. त्यामुळे लक्षात राहील असाच सिक्रेट कोड बनवावा. तसेच सिक्रेट कोड देऊन देखील पूर्वीप्रमाणे चॅट लिस्टच्या टॉपला जाऊन स्वाइप डाउन केल्यावर लॉक्ड चॅट दिसतीलच.
हे देखील वाचा: अर्ध्या किंमतीत मिळतोय ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही; सोबत २ वर्षांची वॉरंटीही
सिक्रेट कोड फीचर सध्या व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनवर टेस्ट केलं जात आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार हा व्हर्जन नंबर २.१३.२१.९ आहे. हे फीचर जुन्या बीटा व्हर्जनमध्ये दिसलं होतं आणि लेटेस्ट अपडेटसह काही युजर्ससाठी देखील हे फिचर उपलब्ध झालं आहे.