याबाबत नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून ३१ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, नोकरीचे ठिकाण, अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भरती २०२३’ (NIELIT) मधील पदे आणि पात्रता:
ड्राफ्ट्समन C – ०५ जागा
लॅब असिस्टंट B – २० जागा
लॅब असिस्टंट A – ०५ जागा
ट्रेड्समन B – २६ जागा
हेल्पर B – २४ जागा
एकूण पदसंख्या – ८० जागा
(वाचा: Exam Tips: सत्र परीक्षेची तयारी करताय? मग ‘या’ टिप्स वापरुन अवघड अभ्यास करा सोपा)
शैक्षणिक पात्रता:
- ड्राफ्ट्समन C – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि मेकॅनिकल विषयात ‘आयटीआय’ सह संबधित कामाचा ०६ वर्षांचा अनुभव.
- लॅब असिस्टंट B – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि संबधित कामाचा ०२ वर्षांचा अनुभव.
- लॅब असिस्टंट A -कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्ण आणि संबधित कामाचा ०२ वर्षांचा अनुभव.
- ट्रेड्समन B – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात ‘आयटीआय’चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक..
- हेल्पर B – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा किंवा त्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी.
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गास किमान १८ वर्षे ते कमाल २७ वर्षे वयोमार्यादा आहे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गास ०३ वर्षांची टीआर एससी/एसटी प्रवर्गास ०५ वर्षांची सूट.
अर्ज फी: खुल्या आणि ओबीसी प्रवर्गास २०० रुपये तर मागासवर्गीय/ महिला/ PWD यांना शुल्क माफ आहे.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२३
या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात थेट अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता ‘राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थे’च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: NHM Dhule Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती! चुकूनही चुकवू नका ही संधी..)