Ambrane Fyre चे फीचर्स
स्मार्टवॉचमध्ये २.०४ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात २.५डी कर्व्ड ग्लासचा वापर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले ८०० निट्झ पीक ब्राइटनेससह एकदम क्रिस्टल क्लियर व्हिज्युअल्स देतो. ह्यात ऑल्वेज-ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर ६० हर्ट्झचा रिफ्रेश रेटही आहे तर स्क्रीनचे रेजोल्यूशन ३६८x४४८ पिक्सल आहे.
हे देखील वाचा: फक्त २००० रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळवा iPhone 13; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर, असा करा बुकिंग
नव्या स्मार्टवॉचमध्ये प्रीमियम डायल आणि त्याचबरोबर ४ जबरदस्त कलर स्ट्रॅपचा वापर करण्यात आला आहे, जे अॅडजस्टेबल आहेत. वॉचमध्ये युआय नेव्हिगेशनसाठी क्राउनही मिळतो. हे स्मार्टवॉच आयपी६७ वॉटर-रेजिस्टंटसह बाजारात आलं आहे.
ह्यात UniPair™ टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे ज्यामुळे Fyre स्मार्टवॉचला ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट मिळतो. बिल्ट-इन मायक्रोफोन्स कॉलिंगसाठी उपयुक्त ठरतात. ह्यात १०० पेक्षा जास्त कस्टमाइजेबल वॉच फेस आहे. Ambrane Fyre मध्ये ५ दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: १००-२०० नव्हे तर आता ४३२ मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरवर काम करत आहे सॅमसंग, लवकरच येऊ शकतो स्मार्टफोनमध्ये
Ambrane Fyre मध्ये १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत तसेच रियल टाइम हार्ट रेट मॉनिटर, SpO2 मॉनिटरिंग, ब्रीद ट्रेनिंग, स्लीप अॅनालिसिस, कॅमेरा कंट्रोल, कॅल्क्युलेटर सारखे फीचर्स मिळतात. हे गुगल फिट आणि अॅप्पल हेल्थ अॅप्ससह कंपेटिबल आहे. हे स्मार्टवॉच मेड इन इंडिया आहे.