एरंडोल येथे शिवसेनेतर्फे सकाळी प्रतिकात्मक पुतळा दहन तर दुपारी पुतळा दहनासह शिवसैनिकांचा जल्लोष…

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवराव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी येथे शिवसेनेतर्फे मंगळवारी सकाळी धरणगाव हायवे चौफुलीवर घोषणाबाजी करत नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला नंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देण्यात आले राणे विरोधात गुन्हा दाखल करावा असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पंचायत समिती पासून घोषणा बाजी करीत तहसील कार्यालयाच्या आवारा बाहेर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडा माळ आंदोलन करण्यात आले व पुतळा दहन करण्यात आला तसेच राणेंना अटक झाल्याबद्दल पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.सकाळच्या आंदोलना प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने,महिला आघाडी प्रमुख महानंदा ताई पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन,शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,आनंदा चौधरी,रवींद्र चौधरी,जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन,प्रसाद दंडवते,गजानन महाजन,गोपाल महाजन,प्रमोद महाजन महेश महाजन,एकनाथ महाजन,नितीन महाजन,आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सायंकाळच्या आंदोलनावेळी आनंदा भाऊ चौधरी,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,राजेंद्र चौधरी रमेश महाजन रवींद्र चौधरी,नाना भाऊ महाजन,कुणाल महाजन,अतुल महाजन,सुनील मराठे,अनिल महाजन,माजी उपसभापती ज्ञानेश्वर बडगुजर,कैलास चव्‍हाण,बबलू पाटील,नितीन बिर्ला,देवानंद ठाकूर,राजेंद्र महाजन,राजेंद्र ठाकूर,गोपाल देशमुख, शांताराम पाटील,बबलू राठोड,समाधान महाजन,सचिन पाटील,बाळासाहेब पाटील,सुनील चौधरी,अमोल भावसार नितीन बोरसे,कुणाल पाटील,ऋषिकेश शिंपी,गोविंदा बिर्ला मोहन महाजन,अजय महाजन,प्रसन्न परदेशी,तुषार शिंपी, अतुल मराठे आदी शिवसैनिक उपस्थित होते.आमदार चिमणराव पाटील व जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने यांच्यातील गटबाजीचे पुन्हा एकदा प्रदर्शन झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला

Comments (0)
Add Comment