वनप्लसला टक्कर येण्यासाठी येतेय iQOO 12 सीरीज; जबरदस्त फीचर्सची माहिती लीक

चिनी स्मार्टफोन मेकर iQOO यावर्षीच्या अखेरपर्यंत iQOO 12 सीरीज लाँच करू शकते. ही iQOO 11 सीरीजची जागा घेईल. कंपनीनं iQOO 11 आणि iQOO 11 Pro यावर्षीच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच केला होता. ह्या सीरीजचा बेस मॉडेल नंतर जागतिक बाजारात आला होता. ह्या स्मार्टफोन्समध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे.iQOO 12 सीरीज बाबत थोडी माहिती लीक झाली आहे. या सीरीजमध्ये एक बेस आणि एक प्रो मॉडेल येऊ शकतो. टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशननं चिनी मेसेजिंग प्लॅटफॉर्म Weibo वर एक पोस्टमध्ये सांगितलं आहे की iQOO 12 सीरीजच्या स्मार्टफोन्समध्ये ६४ मेगापिक्सलचा OV64B टेलीफोटो सेन्सर 3x झूम आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबलाइजेशन ( OIS) सपोर्टसह येईल. तसेच ५० मेगापिक्सलचा OmniVision कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL JN1 सेन्सर अल्ट्रा-वाइड लेन्ससह दिला जाऊ शकतो.

याआधी काही लीक्समध्ये सांगण्यात आलं होतं की iQOO सीरीजमध्ये Samsung E7 AMOLED डिस्प्ले २के रिजॉल्यूशन आणि १४४ हर्ट्झ पर्यंतचा रिफ्रेश रेट मिळू शकतो. ह्या स्मार्टफोन्समध्ये प्रोसेसर म्हणून Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoCs दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर २४ जीबी रॅम आणि १ टीबी पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज मिळू शकते. ह्या सीरीजच्या बेस मॉडेलमध्ये ५,००० एमएएचची बॅटरी १०० वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.

अलीकडेच iQOO नं Z8 आणि Z8x लाँच केला होता. जे iQOO Z7 आणि Z7xची जागा घेतील. iQOO Z8 मध्ये ऑक्टाकोर MediaTek Dimensity 8200 SoC आणि Z8x मध्ये क्वॉलकॉम Snapdragon 6 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स ड्युअल रियर कॅमेऱ्यासह आले आहेत. हे चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. iQOO Z8 ची किंमत १९,३०० रुपयांपासून सुरु होते. तर iQOO Z8x चा बेस मॉडेल १४,८०० रुपयांमध्ये लाँच झाला आहे. लवकरच ह्या हँडसेटची एंट्री भारतात होण्याची शक्यता आहे.

Source link

iQOO 12iQOO 12 Priceiqoo 12 specificationआयकू १२आयकू १२ स्पेसिफिकेशन्स
Comments (0)
Add Comment