Nokia G42 5G ची किंमत
भारतीय बाजारात नोकिया जी४२ ५जी फोनच्या नव्या ८जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा मॉडेल १८ ऑक्टोबरपासून विकला जाईल. ह्या मॉडेल सोबत ९९९ रुपयांचे ब्लूटूथ हेडफोन मोफत मिळतात. तर ६जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,५९९ रुपये होती जो अॅमेझॉन सेलमध्ये ११,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. नोकिया जी४२ ५जी Grey, Purple आणि Pink कलरमध्ये उपलब्ध आहे.
नव्या व्हेरिएंटमधील बदल
नोकिया जी४२ ५जी च्या नव्या मॉडेलमध्ये फक्त रॅम वाढवण्यात आला आहे, इतर फीचर्स बदलले नाहीत. हा फोन ८जीबी फिजिकल रॅमला सपोर्ट करतो. तर ८जीबी वर्चुअल रॅमच्या मदतीनं १६जीबी पर्यंत रॅम वाढवता येतो. तर जुन्या व्हेरिएंटमध्ये ६जीबी फिजिकल रॅम सोबतच ५जीबी वचुर्अल रॅम मिळतो.
हे देखील वाचा: Flipkart Sale: १० हजारांच्या आत उपलब्ध झाले लॅपटॉप; ऑनलाइन क्लासेससाठी आहेत बेस्ट
Nokia G42 5G चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया जी४२ ५जी फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह येणार हा एलसीडी पॅनल ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा मोबाइल फोन अँड्रॉइड १३ ओएसवर लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Nokia G42 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ह्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंट पॅनलवर ८ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
हे देखील वाचा: धडामकन पडली OnePlus Nord 3 5G ची किंमत; Amazon सेलमध्ये मिळतोय जबरदस्त डिस्काउंट
पावर बॅकअपसाठी डिवाइसमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी आहे, जी २०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Nokia G42 5G मध्ये ड्युअल सिम ५जी आणि ४जी सोबतच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, OZO प्लेबॅक ऑडियो, वायफाय आणि ब्लूटूथ सारखे फिचर मिळतात.