यंदा कॅट २०२३, २६ नोव्हेंबरला; २५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध

CAT 2023 Admit Card: इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), लखनऊने अधिकृतपणे Common Admission Test (कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट) म्हणजेच CAT Admit Card 2023 मिळण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र (Admit Card) २५ ऑक्टोबर रोजी उमेदवारांना ऑनलाइन मिळणार आहे. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाइटवर लिंक सक्रिय केली जाईल. ज्याच्या मदतीने उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

कॅटच्या समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवार २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून CAT च्या iimcat.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. यासाठी त्यांना नोंदणी क्रमांकासह इतर तपशील प्रविष्ट करावे लागतील. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांना तपशील तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय, प्रवेशपत्रातील नाव अथवा इतर तपशीलामध्ये काही चूक आढळल्यास ती दुरुस्तीसाठीची प्रक्रिया करण्याचा सल्लाही उमेदवारांना देण्यात आला आहे.

(वाचा : बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेणे बंधनकारक नाही, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार निवड करता येईल : शिक्षणमंत्री)

उमेदवारांना कॅट परीक्षेचे प्रवेशपत्र (official Admit Card) आणि फोटो ओळखपत्राच्या (Photo Id Proof ie. Aadhar Card, PAN card, Passport, DV इत्यादी.)आधारेच परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनीही या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल. तर, परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

अधिसूचनेनुसार, कॅट २०२३ परीक्षा २६ नोव्हेंबर २०२३ रोजी घेतली जाईल. दिवसभरात तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. पहिले सत्र सकाळी ८.३० ते १०.३०, दुसरे सत्र दुपारी १२.३० ते २.३० आणि तिसरे सत्र दुपारी ४.३० ते ६.३० या वेळेत घेतला जाईल. यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होणार असून, १५५ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार्‍या या परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण १२० मिनिटे दिली जाणार आहेत.

CAT 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी :

– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर अ‍ॅडमिट कार्ड (Admit Card) लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– प्रवेशपत्र समोर असेल.
– प्रवेशपत्राची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : NEET UG New Syllabus: नीट-युजी २०२४ चा अभ्यासक्रम तयार; अधिकृत वेबसाटवर मिळणार संपूर्ण माहिती)

Source link

catCAT 2023cat 2023 admit cardcat 2023 exam datecat examcommon admission test 2023iimindian institutes of managementindian institutes of management entrancemanagement entrance exam
Comments (0)
Add Comment