खादी व ग्रामोद्योग आयोगात होतेय नवीन भरती; संचालक पदासाठी बीई किंवा बी-टेक झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी

KVIC Mumbai Recruitment 2023: जे नोकरीच्या शोधत आहेत आणि ज्यांना मुंबईत नोकरी मिळवायची आहे. त्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई अंतर्गत संचालक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर २०२३ आहे. मात्र, उमेदवारांनी विहित तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य गरजेचे आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई
भरले जाणारे पद :संचालक
एकूण रिक्त पदे : १० पदे
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ४ नोव्हेंबर २०२३

(वाचा : NET Exam 2024: यूजीसीची घोषणा, यंदाची ‘नेट’ परीक्षा ६ ते २२ डिसेंबरला; अशी असेल अर्ज प्रक्रिया)

या पत्त्यावर पाठवा अर्ज :

Director (Administration and HR),
Khadi and Village Industries Commission,
Gramodaya, 3, Irla Road, Vile Parle (W), Mumbai 400 056 (Maharashtra)

(अर्जविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. (BE or B-Tech)
  • चार्टर्ड अकाउंटंट (Chartered accountant)
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून मास्टर्स पर्यंतचे शिक्षण
  • मान्यताप्राप्त संस्थेतून विधी विषयात पदवीधर (Law Degree)

मिळणार एवढा पगार :

Khadi and Village Industries Commission मधील संचालक पदाच्या भरतीअंतर्गत निवड होणार्‍या उमेदवारला प्रतिमाह Pay Band-3 नुसार, १५ हजार ६०० ते ३९ हजार १०० रुपये with Grade pay of ७ हजार ६०० रुपये (pre- revised) (Revised pay as per 7th CPC pay matrix Level-12) एवढे वेतन आणि भत्ता दिला जाईल.

खादी व ग्रामोद्योग आयोगात अर्ज करण्यासाठी :

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवणे अनिवार्य असणार आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचावे.

Khadi and Village Industries Commission च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

(वाचा : CAT 2023 Updates: यंदा कॅट २०२३, २६ नोव्हेंबरला; २५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध)

Source link

directorDirector (Administration and HR)Khadi and Village Industries CommissionKVICKVIC Mumbai Recruitment 2023mumbaioffline admission process
Comments (0)
Add Comment