इअरबड्स फ्री
वनप्लस 11 5जी स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ५६,९९९ रुपये आहे. फोन १६जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६१,९९९ रुपये आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये वनप्लस ११ ५जी स्मार्टफोन ४००० रुपयांच्या डिस्काउंट कुपनसह खरेदी करता येईल. त्याचबरोबर ३००० रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. त्यानंतर बेस व्हेरिएंटची किंमत ५० हजार रुपये होते. तसेच जर तुम्ही हा फोन विकत घेतला तर OnePlus Buds Z2 मोफत मिळतील, ज्याची किंमत ४,९९९ रुपये आहे.
हे देखील वाचा: एकच नंबर! १६ हजारांत ६०००एमएएचची बॅटरी आणि १२ जीबी रॅम, Honor Play 50+ येणार का भारतात?
वनप्लस ११ ५जी चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस ११ ५जी स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेटवर चालतो, जो क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आहे. फोन थर्ड जनरेशन हॅसेलब्लॅड कॅमेरा आणि डॉल्बी व्हिजन एचडीआर आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह बाजारात आला आहे.
हे देखील वाचा: सॅमसंगला टक्कर देण्यासाठी OnePlus Open येतोय भारतात; कंपनीनं टीज केला फोन
फोन १०० वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगसह येतो. फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स५८१ सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ४८-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सरसह ३२-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.